Home /News /maharashtra /

'जयंत पाटील हे अनवधानाने राजकारणात आलेले पात्र', पडळकरांची विखारी टीका

'जयंत पाटील हे अनवधानाने राजकारणात आलेले पात्र', पडळकरांची विखारी टीका

'राष्ट्रवादी पक्षच भविष्यात राहील का नाही हे माहित नाही, त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही'

सांगली, 23 जानेवारी : 'जयंत पाटील हे अनवधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील (jayant Patil) राजारामबापूंच्या जागेवर अनुकंपाच्या जागेवर गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत, अशा शब्दांत भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी टीका केली आहे. सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. 'जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली आहे, याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पडळकर म्हणाले की, 'जयंत पाटील हे अनवधानाने राजकारणात आलेलं पात्र आहे. मी एक शिक्षकाचा मुलगा आहे, माझे वडिलांची तब्येत चांगली नसल्यामुळे अनफिट झाले म्हणून मी जिल्हा परिषदेला चौकशी करण्यासाठी गेले असता तिथे मोठा भाऊ होता. त्यांनी अनुकंपाखाली भरती करता येते असं सांगितले, याला फक्त पात्रात लागते. जर शिपाई व्हायचे असेल 10 पास असावे लागते, पदवी असेल तर वरिष्ठ जागा मिळते. अनुकंपामध्ये पात्रता लागते, गुणवत्ता लागत नाही. त्यामुळे जयंत पाटील हे राजाराम बापूंच्या जागी गुणवत्ता नसताना अनुकंपाच्या जागेवर राजकारणात अनवधानाने आले आहे' अशी टीका पडळकर यांनी केली. 'राष्ट्रवादी पक्षच भविष्यात राहील का नाही हे माहित नाही, त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही', असंही पडळकर म्हणाले. तसंच, 'जयंत पाटलांना युनोमध्ये वगैरे पाठवता येत का, हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे, कारण ते फार बुद्धिमान आहेत अशी त्याची पक्षाची भूमिका आहे' असा खोचक टोला सुद्धा पडळकर यांनी लगावला. गोपीचंद पडळकर यांनी याआधीही सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विखारी शब्दांत टीका केली आहे.  'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीका पडळकरांनी केली होती. त्यांच्या या टीकेनंतर भाजप आणि राष्ट्रवादी असा वाद पेटला होता. पडळकर यांच्या या विधानामुळे सांगलीत राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

Tags: Jayant patil, जयंत पाटील

पुढील बातम्या