मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रकाश आंबेडकरच करताहेत भिडे आणि एकबोटेंची पाठराखण, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

प्रकाश आंबेडकरच करताहेत भिडे आणि एकबोटेंची पाठराखण, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास 'एनआयए'कडे गेल्याने राजकीय वर्तुळात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास 'एनआयए'कडे गेल्याने राजकीय वर्तुळात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास 'एनआयए'कडे गेल्याने राजकीय वर्तुळात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

सांगली,25 जानेवारी: कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास 'एनआयए'कडे गेल्याने राजकीय वर्तुळात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर.आर. पाटील होते, आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजपचे काम काही मंत्रीच करत असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकरांनी केला यावेळी केला. त्यावर जयंत पाटील यांनी सांगलीत एक गौप्यस्फोट केला आहे. आंबेडकरांचा यांचा आरोप हास्यास्पद असून तेच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचवत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या साक्षमध्ये भिडे, एकबोटे यांचे नाव का घेतले नाही, याचा अर्थ आंबेडकर हेच भिडे आणि एकबोटे यांची पाठराखण करत आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. संभाजी भिडेंच्या बचावाला जयंत पाटील आहेत ना, पूर्वी आर आर पाटील होते. आता जयंत पाटील आहेत. भाजपचं काम काही मंत्रीच करत आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास 'एनआयए'कडे देण्याचा निर्णय निषेधार्ह आणि चुकीचा आहे. तपासातील खोटेपणा उघड होण्याची सरकारला भीती वाटते, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा फक्त 'टीआरपी' वाढवण्यासाठी आहे, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली.

सत्य बाहेर येण्याच्या भीतीमुळे NIA कडे तपास, शरद पवारांचा हल्लाबोल

भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित तपास राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(National Investigation Agency )कडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणात NIA कडे तपास दिला आहे,' असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला आहे.

'कायदा व सुवव्यवस्था हे राज्य सरकारचं काम आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवलं नाही. एल्गार परिषदेत चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. अन्यायाबद्दल बोलणं म्हणजे नक्षलवाद नव्हे. आम्ही एसआयटीची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने कुरघोडी केली आहे. सत्य बाहेर या भितीनं एनआयएकडे तपास,' असं पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणातील तपासाबाबत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलिसांशी आढावा बैठक घेतली होती. मात्र आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. हा तपास एनआयएकडे सोपविल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असा आरोप केला आहे की, केंद्र सरकारने त्यांच्याशी यापूर्वी कोणतीही चर्चा केली नव्हती. यापूर्वी आढावा बैठकीची काही प्रकरणे मागे घेण्यात आली होती आणि एसआयटीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.

अनिल देशमुख पुढे म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारच्या सहमतिशिवाय एनआयएकडे देण्यात आला. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवणं संविधानाच्या विरोधात आहे. मी याचा निषेध करतो.

First published:

Tags: Jayant patil, Maharashtra news, Milind ekbote, Prakash ambedkar, Sambhaji bhide