मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

त्यांनी तरी किती जणांची मने सांभाळायची? जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले..

त्यांनी तरी किती जणांची मने सांभाळायची? जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा (CM Eknath Shinde) शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे. पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले 5 मंत्री नाराज झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा (CM Eknath Shinde) शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे. पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले 5 मंत्री नाराज झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा (CM Eknath Shinde) शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे. पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले 5 मंत्री नाराज झाले आहेत.

  • Published by:  Rahul Punde
सांगली, 14 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा (CM Eknath Shinde) शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे. पण, या खातेवाटपामुळे शिंदे गटातले 5 मंत्री नाराज झाले असल्याची चर्चा आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे दादा भुसे (Dada Bhuse) यांचा फोन स्विच ऑफ येत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी किती जणांची मने सांभाळायची : जयंत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना किती जणांची मने आणि किती लोकांना सांभाळायचे, त्यामुळे सगळ्यांनी एकनाथ शिंदेंना समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी टोला लगावला आहे. तसंच स्वातंत्र्यदिनी खाते असणारे मंत्री ध्वजवंदना करतील, अशा शब्दात आमदार व माजी मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या खाते वाटपावरून टोला लगावला आहे. तसेच खात्याचे मंत्री महाराष्ट्राचे विकासासाठी उपलब्ध झाले, त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते. शिवसंग्राम संघटनेचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल आमदार जयंत पाटील यांनी दुःख व्यक्त केलं आहे. चळवळीतील आणि मराठा समाजाच्या समस्या बाबतीत आग्रह असणारे नेतृत्व गमावल्याची भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. कोणाला कोणती खाती? राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग इतक्या खात्यांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तुलनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमी खाती देण्यात आली आहेत. गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे. 'सगळ्यात मोठी बेईमानी आमच्यासोबत', अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत 1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 2) सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 3) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य 4) डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास 5) गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 7) दादा भुसे - बंदरे व खनिकर्म 8) संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन 9) सुरेश खाडे - कामगार 10) संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन 11) उदय सामंत - उद्योग 12) तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 14) अब्दुल सत्तार - कृषी 15) दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा 16) अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण 17) शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क 18) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
First published:

Tags: Eknath Shinde, Jayant patil

पुढील बातम्या