बुलडाणा, 18 एप्रिल: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थिती जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ( CRPF) जवानांच्या पथकावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. त्या महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा समावेश आहे. या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील जवान शहीद सी.बी. भाकरे यांना वीरमरण आलं आहे.
हेही वाचा..औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी डिलिव्हरी, दिला गोंडस मुलीला जन्म
जम्मू-काश्मीरमधील सोपोर आणि बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकांवर हल्ले केले. यात CRPF चे तीन जवान शहीद झाले. त्यात 38 वर्षीय चंद्रकांत भगवंतराव भाकरे (सी.बी.भाकरे) यांचा समावेश आहे. सी.बी.भाकरे हे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी आहे.
Terrorists attack a joint party of CRPF & police personnel in Sopore in Baramulla district in Jammu & Kashmir. More details awaited. pic.twitter.com/GyCj2uWlQY
— ANI (@ANI) April 18, 2020
हेही वाचा.. चीनने 190 लाख कोटी द्यावेत'; मुंबईच्या वकिलाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका
लष्करप्रमुखांनी नुकतीच दिली होती भेट
लष्करप्रमुख मनोद नरवणे यांनी नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वाच्या भागांना भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर टीकाही केली होती. जग कोरोनाविरुद्ध लढत आहे. भारत जगभरात औषधी पाठवतो आहे तर पाकिस्तान दहशतवाद निर्यात करण्याचं धोरण सोडायला तयार नाही, असं मत लष्करप्रमुखांनी व्यक्त केलं होतं.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Terrorist attack