दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण, 2 महिन्यांची लेक झाली पोरकी

दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण, 2 महिन्यांची लेक झाली पोरकी

सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांशी दोन हात करताना कराड तालुक्यातील मुंडे गावचे सुपुत्र संदीप सावंत शहीद झाले आहेत.

  • Share this:

किरण मोहिते, प्रतिनिधी

सातारा, 01 जानेवारी: नवीन वर्षाच्या पहिल्याद दिवशी सीमेवरून महाराष्ट्रासाठी दुखद बातमी आली आहे. नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सातारा जिल्ह्यातील संदीप सावंत या जवानाला वीरमरण आलं आहे. या चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले होते. त्यातील एक जवान हे गोरखपूरचे आहेत तर दुसरे जवान हे साताऱ्यातील कराड तालुक्यातील आहेत.

सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांशी दोन हात करताना कराड तालुक्यातील मुंडे गावचे सुपुत्र संदीप सावंत शहीद झाले आहेत. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत  शहिद संदीप यांचे पार्थिव मुळगावी येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शहीद संदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी आणि दोन महिन्यांची मुलगी आहे. संदीप यांच्या जाण्यामुळे सावंत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजूनही नौशेरा सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. आजपासून जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. एका बाजूला नव्या वर्षाचा उत्साह आणि नव्या वर्षानिमित्तानं जम्मू -काश्मीरमध्ये पुन्हा इंटरनेट सेवा सुरू होताच वाईट बातमी आली.

इतर बातम्या - निर्भया प्रकरणात चारही आरोपींना एकाच वेळी देणार फाशी, तिहारमध्ये अशी केली तयारी

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी खारी थरयाट जंगलात घुसखोरी करून कब्जा केला होता. पाकव्याप्त काश्मीरमधून ते भारताच्या हद्दीत घोसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती जवानांना मिळताच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. अजूनही सर्च ऑपरेशन जारी असल्याची माहिती  जनसंपर्क अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली.

जम्मू-काश्मीरला (Jammu-Kashmir) सरकारने 'न्यू ईयर गिफ्ट' दिले आहे. काश्मीर खोऱ्यात मंगळवारी मध्यरात्रीपासून SMS सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळा, महाविद्यालये आणि हॉस्पिटल्समध्ये इंटरनेट सेवा (Internet Service) सुरू करण्यात आली आहे. 5 ऑगस्टला कलम 370 (आर्टिकल 370) हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लॅंडलाइन, इंटरनेट आणि शॉर्ट मेसेज सर्व्हिस (एसएमएस) बंद करण्यात आली होती. दरम्यान, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हळूहळू काही भागातील प्रतिबंध हटवण्यात आले होते. आता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये SMS आणि इंटरनेट सर्व्हिसही सुरू करण्यात आली आहे.

इतर बातम्या - शहीद मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईने सोडले प्राण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2020 06:33 PM IST

ताज्या बातम्या