नव्या घराचं स्वप्न अधुरंच राहिलं...पाकच्या हल्ल्यात कोल्हापूरचे संग्राम पाटील शहीद

नव्या घराचं स्वप्न अधुरंच राहिलं...पाकच्या हल्ल्यात कोल्हापूरचे संग्राम पाटील शहीद

दोन महिन्यांपूर्वी नुकतंच घराचं बांधकाम सुरू केलं मे महिन्यापर्यंत घर पूर्ण होईल आणि संग्राम त्या घरात प्रवेश करतील अशी सर्वांची आशा होती.

  • Share this:

कोल्हापूर, 21 नोव्हेंबर : ऐन दिवाळीमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रांना वीरमरण आलं होतं. त्या दु:खातून सावरेपर्यंत पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखीन एका सुपुत्राला वीरमरण आलं आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरातील जवान संग्राम पाटील शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.

संग्राम पाटील यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. संग्राम पाटील मे महिन्यात सुट्टीवर येणार होते. दोन महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापुरात घर बांधायला देखील सुरुवात केली होती. आपलं एक छान घर असाव असं त्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न त्यांना मे महिन्यात पूर्ण करून त्यांना सरप्राइज देण्याच्या तयारीत असतानाच ही बातमी आल्यानं पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

हे वाचा-Nagrota Encounter : पाकिस्तानी म्होरक्यासोबत संपर्कात होते दहशतवादी

संग्राम पाटील यांचं घर बांधण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यांच्या विना घर पोरकं झाल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. तर कोल्हापुरातील दुसरा सुपुत्र गेल्यानं शोकाकूल वातावरण आहे. बेळगाव मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच मुख्य केंद्र असल्यामुळे आजही या भागातील अनेक जवान सीमेवर कार्यरत आहेत दरम्यान निगवे खालसा या गावातील काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संग्राम यांचे पार्थिव गावी आणण्यात येणार आहे त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 21, 2020, 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading