कोकणात जलयुक्त शिवाराच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार -रामदास कदम

कोकणात जलयुक्त शिवाराच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार -रामदास कदम

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवाराच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलाय.

  • Share this:

13 मे : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवाराच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलाय. त्याबाबतचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली आणि मंडणगड  या तीन तालुक्यांमध्ये २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत तब्बल १० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र वस्तुस्थिती पाहता १० कोटी रुपयांची कामेच झाली नाहीत. अवघ्या निम्म्या म्हणजेच ५ कोटी रुपयांची कामे झाली आहेत आणि ती देखील निकृष्ट दर्जाची.

एका मजूर संस्थेला ३ पेक्षा अधिक कामे नियमाप्रमाणे देता येत नाहीत. मात्र येथे एका संस्थेच्या नवे २५ ते २६ कामे दिली गेली आहेत हे त्यांच्या ध्यानात आले. जलसंधारणाच्या बांधलेल्या बंधाऱ्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पाहणीत उघड झाले.  अनेक ठिकाणी एका पेक्षा जास्त बंधारे बांधून निधी लाटल्याचेही त्यांनी उघड केले. डोंगरातून पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून समतल चर खोदण्यात येतात त्यालाही काही नियम शासनाने ठरवू दिलेत मात्र दापोली तालुक्यातील वनौषी- पंचनदी आणि खेड तालुक्यातील नीलवणे येथे ६ हेक्टर जागेत २ ते अडीच हार चर मारणे गरजेचे असताना केवळ २६ चर खोदून लाखो रुपयांचा निधी लाटल्याचे त्यांनी उघड केले आहे.

शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या जलसंधारणाच्या कामात झालेल्या या कोटयावधी रुपयांच्या भ्रष्टचाराची चौकशी करून अधिकारी ठेकेदार आणि या योजनेचे अध्यक्ष असलेले राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गोळा केलेले पुरावे त्यांना सादर करणार आहेत. अधिकारी ठेकेदार आणि आमदार यांनी कशा पदाथातीने शासनाचा कोटयावधी रुपयांचा निधी लाटला याचे पितळ ते उघडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे

राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणामध्ये पडतो मात्र उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी मैलोन मेल चालत जावे लागते, कोकणात सिंचनाचे प्रमाण देखील खूप कमी आहे अशा वेळी  शासनाने सुरू केलेल्या या जलयुक्त शिवार योजनेत अशा प्रकारे जर भ्रष्टचार होत असेल तर कोकणातील शेतकऱ्यांची पाण्यासाठीची धडपड कशी थांबेल हा प्रश्न आहे आता मुख्यमंत्री सबंधितांवर कधी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

First published: May 13, 2017, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading