Home /News /maharashtra /

Jalyukt Shivar: बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरण; तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक, 90 लाखांच्या वसुलीचे आदेश

Jalyukt Shivar: बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरण; तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक, 90 लाखांच्या वसुलीचे आदेश

(प्रातिनिधिक फोटो - mrsac.maharashtra.gov.in)

(प्रातिनिधिक फोटो - mrsac.maharashtra.gov.in)

बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजना घोटाळ्याच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या घोटाळ्याच्या संबंधित कंत्राटदारांकडून वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.

बीड, 17 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) घोटाळ्याच्या संबंधित आता मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात आता कंत्राटदारांना (Contractor) जोरदार झटका बसला आहे. कारण, संबंधित कंत्राटदारांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच तीन निवृत्त अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (Jalyukt Shivar yojana scam: order of recover 90 lakh rupees from contractors of Beed) तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक बीडच्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पाच वर्षांपासून फरार असलेल्या तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना परळी पोलिसांनी अटक केली आहे. सुनील गीते (वय 58 वर्ष), उल्हास भारती (वय 64 वर्ष) आणि त्र्यंबक नागरगोजे (वय 64 वर्ष) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारातील घोटाळ्यासंदर्भात 2017 मध्ये परळी पोलीस स्टेशन मध्ये दोन कोटी 41 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदार यांचा समावेश होता. 90 लाख वसुलीचे आदेश बीड जिल्ह्यातील असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्या तील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले आहेत. या जलयुक्त शिवार आतील घोटाळ्यासंदर्भात आत्तापर्यंत परळीतील अनेक अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई झालेली आहे. वाचा : अल्पवयीन मुलींचा विनयभंग करुन पळायचा,3200 बाईक्सचा तपास करत पोलिसांनी केलं गजाआड 62 कंत्राटदारांकडून वसुली होणार काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजना मध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती त्यानंतर मागच्या अनेक दिवसापासून याची चौकशी सुरू आहे. या कामांमध्ये नव्वद लाख रुपयांच्या वसूल पात्र असलेल्या संस्थांन नोटीस देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 62 कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचार्‍यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे काय आहे संपूर्ण प्रकरण? जलयुक्त शिवार योजना संपूर्ण राज्यभरात राबवण्यात आली. मात्र, बीडमधील जलयुक्त शिवार योजनेत मोठा गैरव्यवहार आणि घोटाळा झाला असल्याची तक्रार करण्यात आली. या संदर्भात 2017 रोजी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. वाचा : पालकांनीच चिमुकलीचं अपहरण करून 2 वर्ष घरातील पायऱ्यांखाली ठेवलं; कारण समोर या घोटाळ्याच्या आरोपांनंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत जलयुक्त शिवार योजनेत अनियमियता आढळून आली. त्यानंतर या संबंधी कंत्राटदारांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंत्राटदरांकडून करण्यात येणाऱ्या या वसुलीच्या कारवाईने एकच खळबळ उडाली. आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप झाला आणि एकच खळबळ उडाली. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने केलेल्या प्राथमिक तपासात जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झाल्याचं आढळून आलं. ज्या कामांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 95 कामांमध्ये अनियमितता आढळून आली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Crime

पुढील बातम्या