मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Jalna News : वडिलांपासून मिळाली प्रेरणा आणि जालन्याला मिळाला 'सायकल मॅन', Video

Jalna News : वडिलांपासून मिळाली प्रेरणा आणि जालन्याला मिळाला 'सायकल मॅन', Video

X
Jalna

Jalna News : जालना शहरातील एका व्यक्तीला एक छंद आहे. ज्यातून पर्यावरणाला हातभार तर लागत आहे.

Jalna News : जालना शहरातील एका व्यक्तीला एक छंद आहे. ज्यातून पर्यावरणाला हातभार तर लागत आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Jalna, India

  नारायण काळे, प्रतिनिधी जालना

  जालना, 18 मार्च : प्रत्येक व्यक्तीला कशाचा ना कशाचा छंद असतो. प्रत्येकजण आपलं आयुष्य वेगळ्या पध्दतीनं जगण्याचा प्रयत्न करतो. जालना शहरातील एका व्यक्तीला असाच एक छंद आहे. ज्यातून पर्यावरणाला हातभार तर लागतच आहे. त्याचबरोबर त्यांचे आरोग्यही उत्तम राहत आहे आणि पैशांची देखील बचत होत आहे.

  काय आहे छंद?

  शहरातील जे ई एस महाविद्यालयातील कर्मचारी विलास बोधले यांना मागील 6 वर्षांपासून सायकल चालवण्याचा छंद जडला आहे. कोणतेही काम ते सायकलवरच करतात. अगदी महाविद्यालयातील रोजचे ये जा देखील ते नित्यनेमाने सायकल ने करतात. त्यांच्या या छंदाबाबत अनेकांना आश्चर्य वाटते. अनेकजण त्यांना तुम्ही असे का करता असं विचारतात. अनेकजण याला काही काम नाही असेही म्हणतात. मात्र, लोकांच्या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विलास बोधले यांनी मागील 6 वर्षांपासून आपला छंद जोपासला आहे. वडिलांकडून सायकल चालवायची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही हे आधीच करायला हवे होते असं आपले कुटुंबीय सांगत असल्याचे विलास बोधले यांनी सांगितले.

  आरोग्याला फायदा 

  चाळिशीच्या वर असलेले बोधले यांना सायकल चालण्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे झालेत. तसेच पेट्रोलचा खर्च देखील वाचला आहे. सायकल चालविल्यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील मदत होत आहे. सायकल पँडल मारावे लागते. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. कोलेस्टेरॉल नियंत्रण राहून वजन वाढत नाही. वजन नियंत्रणात राहिल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार होत नाहीत. तसेच कामात नेहमी उत्साह जाणवतो. यामुळे ज्याला शक्य आहे त्या प्रत्येकाने सायकलच्या वापर करावा, असं आवाहन बोधले यांनी केले आहे.

  Success Story : जालन्यातील तरुणी बनली फॅशन विश्वात ब्रँड, जगभरात होतीय कपड्यांची निर्यात, Video

  एक उपक्रम सुरू केला 

  महाविद्यालयातही त्यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. यामुळे दर शनिवारी कर्मचाऱ्यांरी सायकलवर येत आहेत. यानुसार चार ते पाच कर्मचारी दर शनिवारी सायकल वर येतात.

  First published:

  Tags: Jalna, Local18