मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सफाई कर्मचाऱ्याच्या मुलीची भरारी, अंतरिक्ष‎ केंद्र पाहण्यासाठी झाली निवड, Video

सफाई कर्मचाऱ्याच्या मुलीची भरारी, अंतरिक्ष‎ केंद्र पाहण्यासाठी झाली निवड, Video

X
Jalna

Jalna News : जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची‎ श्रीहरिकोटा येथे सहल‎ काढण्यात येणार आहे. यामध्ये कल्याणी जाधव हीची देखील निवड झाली आहे.

Jalna News : जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची‎ श्रीहरिकोटा येथे सहल‎ काढण्यात येणार आहे. यामध्ये कल्याणी जाधव हीची देखील निवड झाली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Jalna, India

  नारायण काळे, प्रतिनिधी

  जालना, 22 मार्च : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन‎ निर्माण व्हावा, संशोधनवृत्ती‎ विकसित व्हावी, शास्त्रज्ञांच्या‎ कार्यपद्धतीची जवळून ओळख‎ व्हावी, यासाठी जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची‎ श्रीहरिकोटा येथे सहल‎ काढण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हापरिषद सीईओ वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील 24 विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा येथील शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. यामध्ये मानेगाव येथील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थिनी कल्याणी जाधव हीची देखील निवड झाली आहे. कल्यानीची आई शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करते. कल्याणी या सहलीमुळे पहिल्यांदाच विमान प्रवास करणार आहे. कशी मिळाली कल्याणीला ही संधी पाहुयात.

  24 जणांची निवड

  जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव, थंबा येथील स्पेस म्युझियम, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी जिल्ह्यातून 24 विद्यार्थ्यांना पाठवले जाणार आहे. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या चाचणीतून 24 जणांची निवड झाली आहे.

  सर्वोत्तम गुणवत्ता धारण विद्यार्थ्यांची निवड  

  यामध्ये जालना तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती विकासासाठी अंतरिक्ष केंद्र, उपक्रम प्रक्षेपण आदी बाबींचा अनुभव घेता यावा यासाठी प्रत्येक तालुक्यातील तीन अशा जिल्ह्यातील 24 विद्यार्थ्यांना पाठवले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात केंद्रांतर्गत इयत्ता 5 वी ते 8 वी वर्गात शिकणाऱ्या जि.प.च्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. गणित तसेच विज्ञान या विषयावर आधारित परीक्षा घेतली. जिल्ह्यात सर्वोत्तम गुणवत्ता धारण करणारे तालुक्यातून तीन अशा 24 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यासाठी डायट तसेच समग्र शिक्षा अभियान यांच्याकडून निवडीसाठी नियोजन पाहिले. या सहलीसाठी विद्यार्थी विमानाने छत्रपती संभाजीनगर ते श्रीहरीकोटा असा प्रवास करणार आहेत.

  अतिशय उत्सुक

  मी आयुष्यात विमान कधी जवळून पाहिले देखील नव्हते. फक्त आकाशात अतिशय छोटेसे विमान पाहिले. मात्र, आता माझी निवड श्रीहरीकोटा येथील शैक्षणिक सहलीसाठी झाली आहे. यासाठी मी तीन परीक्षेत यश मिळवले. यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. मी पहिल्यांदा विमानात बसण्यासाठी अतिशय उत्सुक आहे, असं कल्याणी जाधव हिने सांगितले.

  सहावीतील शास्त्रज्ञ! मियावाकी पद्धतीनं करतोय झाडं लावण्यावर संशोधन, पाहा Video

  मला खूप आनंद 

  मी जिल्हापरिषद शाळेत साफ सफाई करण्याचे काम करते. आमची मुलगी एवढ्या दूर जाईल असे कधीही वाटल नव्हतं. ती विमानाने श्रीहरीकोटाला जाणार आहे. याचा मला खूप आनंद आहे, असं कल्यानीची आई सुनीता जाधव यांनी सांगितले. तर मुलीच्या यशासाठी शाळेतील शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल कल्याणीचे वडील नारायण जाधव यांनी शिक्षकांचे अभिनंदन केलं. तसेच मुलीला शिकवण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही असं त्यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Jalna, Local18