नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 28 मार्च : लग्न समारंभ म्हंटला की त्यामध्ये प्रथा आणि परंपरा आल्याच. राज्यातील प्रत्येक भागातील लग्नात वेगवेगळ्या प्रथा पाहयला मिळतात. काळाच्या ओघात यामध्ये काही बदल झाले. नव्या परंपरांनी जुन्याची जागा घेतली. पण, काही जुन्या परंपरा आजही टिकून आहेत. जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांब या गावी अशीच एक आजही सुरू आहे.
जालना जिल्ह्यातील श्री क्षेत्र जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरात लग्नानंतर दर्शनासाठी येणाऱ्या वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा आजही जांब समर्थांच्या राम मंदिरात भाविकांकडून जोपासली जात आहे.जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरात सीतामातेची मूर्ती रामाच्या उजव्या बाजूला आहे. लग्नानंतर दर्शनाला आल्यावर वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. राम मंदिरातील दुर्मिळ वस्तू आजही पाहावयास मिळतात.
लक्ष्मणानं 'इथं' कापलं होतं शूर्पणखाचे नाक, पाहा कुठं आणि कशी आहे 'ती' जागा, Video
समर्थांचे वडील सूर्याजीपंत यांना शके 1425 माघ शुद्ध सप्तमीला प्रत्यक्ष सूर्यनारायणाने दिलेले श्रीराम पंचायतन, रामनवमी उत्सवात पंगतीला तूप कमी पडले होते त्यावेळी समर्थ रामदासांनी राम मंदिरातील समोरील आडातील पाणी काढून खापराच्या घागरीतून वाढले ती घागर आजही पाहावयास मिळते.
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान
समर्थांचा जन्म शके 1530 चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच 1608 मध्ये रामनवमीच्या दिवशी ऐन राम जन्माच्या वेळी झाला. श्रीराम प्रभू आणि समर्थ रामदास या दोघांच्या जन्मतिथी व जन्मवेळ एकच असण्याचा अतिशय अनोखा असा हा योग आहे. राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामींच्या जन्माने पावन झालेले जांब गाव आज अखिल महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान, यात्रास्थान बनले आहे. समर्थाच्या पूर्वजांनीच ते वसविले असल्याचा इतिहास आहे. या गावाच्या कुळकर्णीपणाचे वतनही श्री समर्थांच्या घराण्यात चालत आले आहे.
श्रीरामानं 'या' मंदिरात केली होती शिवलिंगाची पूजा! पाहा काय आहे आख्यायिका, Video
श्रीराम मंदिरात उत्सव
जांब या गावातील श्रीराम मंदिरात 31 मार्चपर्यंत दहा दिवसांचा रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे. . या दहा दिवसामध्ये श्रीरामरायासमोर कीर्तन, प्रवचन, रामकथा, उपासना, गायन हे कार्यक्रम होत आहेत. संपूर्ण राज्यभरातील भाविक या काळात या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. या उत्सव कालावधीमध्ये दर्शनासाठी नक्की यावं असं आवाहन भूषण स्वामी यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalna, Local18, Ram Navami 2023