मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ना डीजे, ना हुंडा! अनावश्यक खर्चाला फाटा देत ‘या’ समाजानं लावले 40 विवाह

ना डीजे, ना हुंडा! अनावश्यक खर्चाला फाटा देत ‘या’ समाजानं लावले 40 विवाह

Jalna News : अगदी साध्या पध्दतीने मुहूर्तावरच होणारे हे लग्न सोहळे इतर समाजासाठी आदर्शदायी ठरू लागले आहेत.

Jalna News : अगदी साध्या पध्दतीने मुहूर्तावरच होणारे हे लग्न सोहळे इतर समाजासाठी आदर्शदायी ठरू लागले आहेत.

Jalna News : अगदी साध्या पध्दतीने मुहूर्तावरच होणारे हे लग्न सोहळे इतर समाजासाठी आदर्शदायी ठरू लागले आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Jalna, India

  नारायण काळे, प्रतिनिधी

  जालना, 14 मार्च : लग्न सोहळ्यात लाखो रुपये खर्च करून अनेक मुलींचे पालक कर्जबाजारी होतात. यातून सावरणे कठीण झाले की कौटुंबिक कलह आणि आत्महत्या यासारख्या घटना देखील घडतात. यामुळे हुंडा न घेण्यासह व‎ देण्यासह अनावश्यक खर्चाला फाटा‎ देऊन अगदी साध्या पध्दतीने विवाह‎ सोहळे पार पाडण्याचा पायंडा जालन्यातील लाड‎ गवळी समाजाने सुरू केला आहे.‎ वर्षभरात 40 तरुणांचे साध्या पद्धतीने समाजाच्या कार्यालयात विवाह सोहळे पार पडले आहेत. अगदी साध्या पध्दतीने मुहूर्तावरच होणारे हे लग्न सोहळे इतर समाजासाठी आदर्शदायी ठरू लागले आहेत.

  विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा भव्यदिव्य होण्याचा अनेक पालकांना मोह आवरता येत नाही. या सोहळ्यावर झालेला अनावश्यक खर्च, यातून कर्जबाजारीपणा, हुंडा पध्दत यामुळे कर्जबाजारी झालेल्या अनेक पालकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे नवरदेव व नवरी अशा दोन्ही कुटुंबीयांवर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही, या दृष्टीने लाड गवळी समाजाने साध्या पध्दतीनेच विवाह सोहळे सुरू केले आहेत.

  तृतीयपंथीय बनली "आई", गरीब मुलीच्या लग्नाचा सर्व खर्च उचलत केलं कन्यादान VIDEO

  कुटुंबीयांकडे दुर्लक्ष 

  अनावश्यक खर्चामुळे श्रीमंत वर्गावर फारसा परिणाम होत नाही. परंतु, मध्यमवर्गीय शेतकरी आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या परिवारांवर त्याचा प्रभाव आणि ताण पडत आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या परिवारावर या सर्व प्रकारचा आर्थिक ताण निर्माण झाल्याने त्यांच्या कर्जात देखील वाढ झाली आहे. यामुळे जालना शहरातील जुना जालना भागातील गवळी मोहल्ला येथे समाज मंदिर करण्यात आले आहे. समाजातील सर्वच विवाह सोहळे या ठिकाणी होत आहेत. हुंड्याचा विषय आला की, सर्व समाजच त्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आदर्श लाड गवळी समाजाने सुरू केला आहे.

  प्रत्येकाने हुंडा न घेण्याची पद्धत केली सुरू

  डीजे लावल्यास तरुणांच्या नाचण्यासह कुठे मद्य विक्री झाल्यास अनेक तरुण या ठिकाणी नाचत असल्याने अनेक लग्न उशिराने लावण्याला कारण ठरत आहे. यामुळे लाड गवळी समाजाने प्रत्येकाने लग्न समारंभात डीजे न लावणे, हुंडा न घेणे, देणे ही पद्धतच समाजाने सुरू केली आहे.

  लेकींचा सन्मान! ग्रामपंचायतीकडून मुलींच्या नावे एफडी तर नवरीला मिळणार माहेरची साडी, Video

  राज्यभरात होतोय अवलंब

  लाड गवळी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात याचा अवलंब केला आहे. हुंडा पद्धतच बंद केल्याने आतापर्यंत एकही फारकतीचे प्रकरण समोर आले नाही. शिवाय, तरुणांनी व्यसनांपासून लांब ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवल्या जात आहे. समाजातील ज्येष्ठ मंडळीसह तरुणांची साथ मिळत असल्याने हा आदर्श निर्माण करु शकत आहे. इतर समाजांनीही याचा अवलंब केल्यास कुणीही कर्जबाजारी होणार नाही, असे लाड गवळी समाजाचे माजी‎ अध्यक्ष गणेश सुपारकर यांनी सांगितले.

  First published:

  Tags: Jalna, Local18