मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हास्यजत्रा फेम श्रद्धा आणि प्रभाकर यांचं कौतुकास्पद पाऊल, जालन्यात 70 जणांना भेटले आणि...

हास्यजत्रा फेम श्रद्धा आणि प्रभाकर यांचं कौतुकास्पद पाऊल, जालन्यात 70 जणांना भेटले आणि...

X
हास्यजत्रा

हास्यजत्रा फेम श्रद्धा आणि प्रभाकर यांनी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

हास्यजत्रा फेम श्रद्धा आणि प्रभाकर यांनी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

नारायण काळे, प्रतिनिधी

जालना, 25 मे : प्रत्येकामध्ये काही ना काही जन्मजात गुणवत्ता असते. पण गरज असते ती तो आपल्या आत लपलेला कलागुण ओळखण्याची. अशाच हरहुन्नरी कलाकारांना शोधण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार श्रद्धा कोठारी हिने जालना शहरात वर्कशॉपचे आयोजन केले होते.  अभिनय क्षेत्रात रुची असलेले असंख्य विद्यार्थी या वर्कशॉपमध्ये सहभागी झाले. आपल्याला अवगत असलेल्या कलागुणांना अधिक धारदार करण्यासाठी नामवंत कलाकारांचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी घेतले.

नव कलाकारांना अभिनयाच्या टीप्स

ग्रामीण भागात लपलेलं टॅलेंट शोधण्यासाठी जालना शहरात वर्कशॉपच आयोजन करण्यात आलं होत. यामध्ये नव कलाकारांना अभिनयाच्या टीप्स देण्यात आल्या. तसेच अभिनय क्षेत्रातील अनेक बारकावे सांगण्यात आले. यावेळी हास्यजत्रा फेम कलाकार प्रभाकर मोरे आणि श्रद्धा कोठारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अपेक्षपेक्षा जास्त चांगला वर्कशॉप

हा वर्कशॉप माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला झाला. विद्यार्थ्यांनी याला खूप भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना अनेक बारकसारीक गोष्टी शिकता आल्या. अनेकांचे उच्चार स्पष्ट नव्हते. ते आता चांगले बोलायला लागले. अनेकांना कॅमेऱ्याच्या बाबतीत अनेक गोष्टी माहीत नव्हत्या त्या त्यांना माहीत झाल्या. आम्हाला अनेकांनी सांगितले इथे नका घेऊ. आम्हाला पण एवढ्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. जवळपास 70 विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेत. मला खूप मज्जा आली, असं श्रद्धा कोठारी यांनी सांगितले.

Jalna News : शेतकऱ्याच्या लेकीची हॅटट्रिक, 3 मुलींची पोलीस भरतीत निवड, गावातच एकच जल्लोष

कला गुणांना वाव मिळावा

ग्रामीण भागात काही मुलं आहेत त्यांच्या अंगी काही कला आहेत. त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी हे वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होत आणि मला मार्गदर्शक म्हणून बोलवलं होत. कला क्षेत्रात ज्यांना आवड आहे. जे अभिनय करू इच्छितात अशा लोकांसाठी हे वर्कशॉप होत. अनेकदा आपल्याला आवड असते इच्छा असते. पण कसं करायचं कुठे जायचं हे कळत नसते. अशासाठी आपल्याच जालना शहरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला पाच वर्षे लागणार असतील अन् आपल्याला जर त्याचे योग्य ज्ञान असेल तर आपण ती सहा महिन्यात मिळवू शकतो, असं प्रभाकर मोरे यांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Jalna, Local18