जालना, 24 मार्च, रवी जैस्वाल: जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून मोठ्या भावानेच आपल्या आठ वर्षांच्या लहान सावत्र भावाची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विराज कुढेकर असं मृत मुलांचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात अधिक तापस सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
जमिनीच्या वादातून हत्या
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील भार्डी गावात शेतीच्या वादातून मोठ्या भावाने आपल्या आठ वर्षांच्या लहान सावत्र भावाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विराज कुढेकर असे या मृत मुलाचे नाव आहे. आरोपी वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर करावी म्हणून सावत्र आईला धमकावत होता. त्यानंतर त्याने आपला सावत्र भाऊ विराज कुढेकर याची शेतात रुमालाने गळा आवळून हत्या केली.
कोयता गँगनंतर आता पुण्यात तलवाल गँगची दहशत; तरुणांकडून 14 वाहनांची तोडफोड
आरोपीला अटक
या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. त्याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalna