मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Jalna News : नवा घोटाळा? जिल्ह्यात 331 टक्के वाढलं फळबाग क्षेत्र! पाहा काय आहे प्रकार, Video

Jalna News : नवा घोटाळा? जिल्ह्यात 331 टक्के वाढलं फळबाग क्षेत्र! पाहा काय आहे प्रकार, Video

X
Jalna

Jalna News : जालना जिल्ह्यात 331 टक्क्यांनी फळपीक विमा संरक्षित क्षेत्रात वाढ झाली आहे.

Jalna News : जालना जिल्ह्यात 331 टक्क्यांनी फळपीक विमा संरक्षित क्षेत्रात वाढ झाली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Jalna, India

  नारायण काळे, प्रतिनिधी

  जालना, 15 मार्च : राज्यात सर्वाधिक मोसंबी जालना जिल्ह्यात घेतली जाते. तसेच द्राक्ष, डाळिंब आणि इतर फळबाग क्षेत्र देखील मोठे आहे. फळबागांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून शासन स्तरावरून फळपीक विमा भरण्याची आणि नुकसान झाल्यास विमा क्लेम करण्याची सुविधा देखील आहे. मात्र, या योजनेचा फज्जा उडल्याचे चित्र जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 331 टक्क्यांनी फळपीक विमा संरक्षित क्षेत्रात वाढ झाली आहे.

  फळबागा नसतानाही विमा भरणाऱ्यांची जिल्हा विभागामार्फत तपासणी सुरू आहे. अद्याप ही तपासणी पूर्ण झाली नसून, किती बोगस प्रकरणे आढळून आली याची माहिती मिळू शकली नाही. परंतु कागदावरच्या फळबागांचा विमा काढणारे अनेकजण यात गुंतणार याची शक्यता आहे. जिल्ह्यात अंबिया बहार 2021 मध्ये विमा संरक्षित क्षेत्र 11 हजार 428 हेक्टर होते. परंतु अंबिया बहार 2022 मध्ये पीक विमा संरक्षित क्षेत्र 37 हजार 884 हेक्टरवर गेले आहे. अचानक अंबिया बहाराचे क्षेत्र तब्बल 331 टक्क्यांनी वाढल्याने शासनासह कंपनीला आश्चर्याचा धक्का बसला आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांद्वारे विमा क्षेत्र संरक्षित केल्याचा संशय असून, पीक विमा भरलेल्या क्षेत्राची तपासणी केली जात आहे.

  सावधान! 'या' प्रकारचा कापूस घेऊ नका, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना गंभीर इशारा! पाहा Video

  47 हजार शेतकऱ्यांनी भरला फळपीक विमा

  फळपीक विमा योजना 2022 मध्ये जिल्ह्यातील जवळपास 47 हजार 684 शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरला आहे. त्यात बदनापूर मधील सर्वाधिक शेतकरी आहेत. शासनाने दिलेल्या आदेशानुसार विमा प्रतिनिधी व कृषी विभागातील कर्मचारी या पथकात सहभागी असणार आहेत. प्रत्येक तालुक्यात पथक अर्जाची तपासणी करीत आहेत. विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे कर्मचारी अर्जाची तपासणी करत आहेत. अद्याप पूर्ण अर्जाची माहिती आलेली नाही. कागदावरच्या फळबागांचा विमा जिल्ह्यात शेतकऱ्यांना अंधारात ठेवून अनेकांनी फळबागा नसतानाही विमा भरला आहे. अशी प्रकरणे बहुतांश निघाल्याची माहिती कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे यांनी दिली आहे.

  Maharashtra Budget : बजेटमधील घोषणांवर शेतकरी खूश, पण... सरकारकडं केली महत्त्वाची मागणी! Video

  काय कारवाई होणार?

  ज्या लोकांनी कागदावरच फळबागांचा विमा घेतला आहे त्यांची माहिती घेतली जात आहे. किती लोकांनी अशी फसवणूक केली हे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्यासमोर ठेवले जाईल. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधितांवर कारवाई होईल, असं भीमराव रणदिवे यांनी सांगितले आहे.

  First published:

  Tags: Agriculture, Farmer, Jalna, Local18