जालना, 26 जुलै : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एका दिवसाच्या नवजात अर्भकाला नदीच्या पात्रात फेकून जीवे मारणाऱ्या मातेचा अवघ्या 12 तासात शोध लावण्यात घनसावंगी पोलिसांना यश आलं आहे. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य एका आरोपीच्या शोधात पोलीस आहेत.
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक येथील नरुळा नदीच्या पात्रातील डोहात शुक्रवारी कपड्यात गुंडाळले एक नवजात अर्भक तरंगतांना ग्रामस्थांना आढळले होते. या नवजात अर्भकाचा साडीने गळा आवळून त्याचे प्रेत नदीत फेकल्याचे दिसून आले होते.
नदीपात्रात एक दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या अर्भकाची नक्की कोणी आणि का हत्या केली, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी याप्रकरणी केलल्या वेगवान तपासामुळे या घटनेतील सत्य समोर आलं आहे.
हेही वाचा - पुणे हादरलं, बंद घरात आढळले सडलेल्या अवस्थेत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह
दरम्यान, घनसावंगी पोलिसांनी तपासवंगी चक्रे फिरवून गावातीलच एका परित्यक्त्या महिलेने अनैतिक संबंधातून जन्मलेला या अर्भकाचा साडीने गळा आवळून प्रेत नदीत फेकल्याचे स्पष्ट झाले. सदर महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिलेचे कोणासोबत अनैतिक संबंध होते? आणखी यात कोणकोण आरोपी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.