बारावीचा पेपर सुरू असताना WhatsApp वर फोडली प्रश्नपत्रिका, दोन शिक्षक ताब्यात

बारावीचा पेपर सुरू असताना WhatsApp वर फोडली प्रश्नपत्रिका, दोन शिक्षक ताब्यात

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून जालन्यात शिक्षकच प्रश्नपत्रिका झेरॉक्स सेंटर चालकाला पाठवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

जालना, 22 फेब्रुवारी : दहावी-बारावीच्या परीक्षांना आता सुरुवात झाली आहे. परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरीही प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार घडत आहे. विद्यार्थ्यांकडून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्ड पावलं उचलत असताना शिक्षकाकडूनच प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

जालान्यातील परतूर हे तालुक्याचं ठिकाण असून इथल्या लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात प्रश्नपत्रिका शिक्षकाकडूनच बाहेर पाठवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक झेरॉक्स सेंटर चालकाला व्हॉटसअॅपवरून प्रश्नपत्रिका पाठवायचा. तिथून काही जणांचा गट विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याचे काम करत होता.

प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवरून बाहेर पाठवल्या जात असल्याचं समोर येताच आयपीएस अधिकारी निलेश तांबेंसह परतूर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. या प्रकरणी दोन शिक्षकासह 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस अधिक तपास करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बारावीच्या परीक्षेला चार मार्चपासून सुरुवात झाली आहे. कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून दरवर्षी भरारी पथके स्थापन केली जातात. त्यातही काही परीक्षा केंद्रे ही संवेदनशील म्हणून ओळखली जातात. एकीकडे विद्यार्थ्यांना गैरप्रकारापासून रोखण्यासाठी मार्गदर्शन केले जात असतानाच शिक्षकानेच प्रश्नपत्रिका अशी फोडल्यानं शिक्षणक्षेत्राला काळिमा फासल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : पेपर हातात आल्यावर Blank व्हायला होतं? घाबरू नका वापरा 7 टिप्स

First published: February 22, 2020, 5:02 PM IST
Tags: HSC

ताज्या बातम्या