सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या बँकांना दणका, पोलिसांनी पाठवली नोटीस

जालनाच्या सदर बाजार पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत आपल्या हद्दीतील सहा बँकांना नोटीस बजावली आहे.

जालनाच्या सदर बाजार पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत आपल्या हद्दीतील सहा बँकांना नोटीस बजावली आहे.

  • Share this:
जालना, 8 एप्रिल : प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यासह विविध खात्यातून पैसे काढण्यासाठी जालन्यात बँकांबाहेर नागरिकांची मोठी गर्दी होते आहे. ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा सरासपणे फज्जा उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या हाहाकाराने त्रस्त असून गर्दीमध्ये या रोगाचं प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठी शासनातर्फे सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र जालन्यात बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सोशल डिस्टनसिंगचा नियम पायदळी तुडवला जात असताना बँकांकडून मात्र आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. अखेर पोलिसांनाच या गोष्टीची दखल घ्यावी लागली आहे. जालनाच्या सदर बाजार पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत आपल्या हद्दीतील सहा बँकांना नोटीस बजावली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, दोन ग्राहकांमध्ये किमान 3 फुटाचा अंतर ठेवा, एकावेळी बँकेत फक्त एकच ग्राहक आत येईल याचे नियोजन करा अन्यथा आपल्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बँकांना नोटीसीद्वारे दिला आहे. नगरमध्येही पैसे काढण्यासाठी मोठी रांग अहमदनगर जिल्ह्यातही सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा उडाल्याचं दिसलं. जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी लोकांनी बँकांसमोर रांगा लावलेल्या बघायला मिळता आहेत. गोरगरीब नागरिक पैसे काढण्यासाठी घराबाहेर निघत असल्याने बँकेसमोर देखील मोठी गर्दी होत आहे. त्यात नऊ तारखेच्या आतच पैसे काढून घ्यावे असे फलक लावल्याने नागरिकही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत बँकेच्या दिशेने धाव घेत आहेत. संपादन- अक्षय शितोळे
First published: