जालन्यात कोरोनाच्या 2 संशयितांना पोलिसांनी घरातून घेतलं ताब्यात

जालन्यात कोरोनाच्या 2 संशयितांना पोलिसांनी घरातून घेतलं ताब्यात

पोलिसांनी कोरोनाच्या दोन संशयितांना त्यांच्या घरातून उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे.

  • Share this:

जालना, 3 एप्रिल : दिल्लीतील निजामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलकी जमात मरकजमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनांची लागण झाल्याचं समोर येत असून त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ सुरू आहे. अशातच दिल्ली येथील तबलिगी जमात मरकजमध्ये सहभागी झाल्याची शक्यता असल्याने जालना पोलिसांनी कोरोनाच्या दोन संशयितांना त्यांच्या घरातून उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे.

जालना जिल्ह्यातून देखील 7 जण या तबलिगी जमात मरकजमध्ये सहभागी झाल्याचं समोर आलं आहे. जालना पोलिसांनी शहरातील युसूफ कॉलोनी आणि व्यंकटेशनगर येथून दोन जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे. दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

या दोघांचा वैद्यकीय अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तबलिगी जमात मरकजमध्ये शामिल झालेल्या इतरांची यादी पोलिसांना मिळाली असून पोलीस त्त्यांचा शोध घेत आहेत.

काय आहे दिल्लीतील मरकज प्रकरण?

मरकज निजामुद्दीन इथे हजारो तबलिगी मुस्लीम जमले होते, ती इमारत साधारण 100 वर्षं जुनी आहे. ते तबलिगींचं मुख्य केंद्र मानलं जातं. मौलाना साद याच इमारतीत असतात. पण या इमारतीला सील केल्यानंतर मौलाना कुठे आहेत याचा पत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही.

भारताच्या कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेलं दिल्लीतल्या निजामुद्दीनचं मरकज ज्यांनी आयोजित केलं त्यांचं नाव मौलाना साद कंधालवी. तबलिगी जमातचं संमेलन त्यांनी निजामुद्दीनला भरवलं. या तबलिगी जम्मातच्या मरकजमुळे आतापर्यंत 400 जण कोरोनाबाधिक झाले आहेत. या मौलवींच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केली आहे. पण मौलाना अजून गायब आहेत. 28 तारखेला ते शेवटी दिसले होते. पण त्यानंतर ते कुठे गेले, हे पोलिसांना माहिती नाही. त्यांची ऑडिओ क्लिप मात्र समोर आली आहे.

मौलाना साद हे या तबलिगी जम्मातचे प्रमुख आहेत. त्यांच्या मरकजसाठी हजारो तबलिगीपंथीय त्या एका मशिदीत जमले होते आणि तिथेच अनेक दिवस राहिले. त्यात अनेक जण विदेशातून पर्यटन व्हिसावर आलेलेही होते. त्यातून कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभर होत आहे.

First published: April 3, 2020, 12:22 PM IST
Tags: jalna news

ताज्या बातम्या