मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पोलिसांची तत्परता! अवघ्या 8 मिनिटांत ATM फोडणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पोलिसांची तत्परता! अवघ्या 8 मिनिटांत ATM फोडणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Accused arrested in 8 Minutes: एटीएम मशिन फोडणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अवघ्या 8 मिनिटांतच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

जालना, 9 जून: पोलिसांनी अवघ्या 8 मिनिटांत एका आरोपीला अटक (Robber arrest in 8 minutes) केली आहे. होय.. ही सिनेमातील कहाणी नाहीये तर खरोखर तसं घडलं आहे. जालना जिल्ह्यात ATM मशिन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत अटक केली. जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी (Gondi Police Jalna) ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

झालं असं की, जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या थिर्थपुरी येथे एसबीआय बँकेचे एटीएम मशिन (SBI ATM) आहे. हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न एका इसमाने केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्तळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 8 मिनिटांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

15 दिवसामध्ये पैसे दुप्पट करण्याचा फंडा, Chinese App ने केली 250 कोटी रुपयांची फसवूणक

आरोपीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला यश आले नाही. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा फोटो घेतला. या फोटोच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी फोटोतील दिसणाऱ्या आरोपी प्रमाणे एक व्यक्ती दिसून आला असता पोलिसांनी त्याची विचारपूस सुरू केली.

चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला इसम हाच आरोपी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी तत्परता दाखवत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. पोलिसांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

First published:

Tags: Crime, Maharashtra