महाराष्ट्राची मान शरमेने खाली; पोलिसांवर पुन्हा हल्ला, 4 जण गंभीर जखमी

महाराष्ट्राची मान शरमेने खाली; पोलिसांवर पुन्हा हल्ला, 4 जण गंभीर जखमी

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

जालना, 12 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आपल्या जीवाचं रान करत आहेत. मात्र याच पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. जालन्यातही असाच प्रकार समोर आला असून यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या पकडलेला दारू साठ्याच्या पंचनामा करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 4 कर्मचारी आणि पंचांवर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील हिसोडा बुद्रुक-जळकी बाजार शिवारात घडली आहे. या हल्यात पारध पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 4 पोलीस व पंच ही गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर रेणुकाई पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच भोकरदन विभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा- शहीद जवानाच्या पार्थिवासोबत पत्नी आणि लहान मुलगा, 10 तासाच्या प्रवासात साधे पाणीही मिळाले नाही!

दरम्यान, पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांचे मनोबल खच्ची होण्याची भीती आहे. त्यामुळे असे हल्ले रोखण्यासाठी या प्रकरणातील आरोपांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी आता समोर येत आहे. त्यामुळे याबाबत सरकारी पातळीवर काही हालचाली होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: April 12, 2020, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading