जालना, 30 नोव्हेंबर : जालन्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ माजली आहे. 5 वर्षीय चिमुकलीवर ब्लेडने वार करून खून झाल्याची घटना (दि.28) रोजी उघडकीस आली होती. जालन्यातील चौधरी नगर परिसरातील ही घटना घडली आहे. आपल्याच 14 वर्षांच्या मुलीने तिच्या चुलत बहिणीची हत्या केली असल्याची माहिती मुलीच्या काकूने सांगितल्याने जालना शहर हादरले होते. दरम्यान ईश्वरी रमेश भोसले असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. ती आपल्या काकांकडे शिक्षणासाठी जालन्यात राहत होती. बहिणीनेच खून केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. परंतु याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली, यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान पोलिसांनी 14 वर्षीय चुलत बहिणीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी याबाबत कसून तपासणी केली असता धक्कादाय माहिती समोर आली आहे. शाळेत जाण्यासाठी घरचे सतत तगादा लावत असल्याने आपल्या चिमुरड्या चुलत बहिणीचा तिने ब्लेडने वार करून खून केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. शिक्षणासाठी जालना येथे काकाकडे राहत असलेल्या ईश्वरीचा खून हा चुलत बहिणीने रागाच्या भरात केल्याचे पुढे आले आहे. संशयित अल्पवयीन मुलीने मागील आठवड्यात शाळेत मोबाइल फोन चोरला होता. ही मोबाइल चोरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पकडली असल्याचीही माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा : सुनेवर ठेवली वाईट नजर, मुलाने केला वार.. नवऱ्याचे 22 तुकडे केल्याचे आरोपी महिलेची कबुली
तिने मोबाईल चोरल्यानंतर या घटनेची शाळेत जोरदार चर्चा रंगली होती. या कारणावरून संशयित अल्पवयीन मुलगी मागच्या काही दिवसांपासून शाळेत गेली नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिने शाळेत जावे, यासाठी कुटुंबीय सतत तगादा लावत होते. मोबाइल चोरी पडल्याने संशयित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जाण्यास तयार नव्हती.
याच रागाच्या भरात तिने सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या अंघोळीसाठी गेलेल्या ईश्वरीचा बाथरूममध्ये खून केला. अल्पवयीन मुलीने ईश्वरीच्या हातावर, गळ्यावर, चेहऱ्यावर वार केल्याची माहिती तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी वडते यांनी दिली. दरम्यान, संशयित अल्पवयीन मुलीला बालसुधारगृह येथे ठेवण्यात आले आहे.
घटनेने जालना हादरले
ईश्वरीचे वडील रमेश भोसले हे शेतकरी आहेत. ते एका खेडेगावात राहातात. त्यांनी आपली मुलगी आपल्या भावाकडे शिक्षणासाठी पाठवली होती. रमेश यांच्या भावाचा जालना जिल्ह्यातील घनसांवगी इथे पॅथॉलॉजी लॅब आहे. ते घनसांवगी येथून जाऊन, येऊन करतात. त्यामुळे जेव्हा पुतणीची हत्या झाली त्यावेळी ते घरात नव्हते. ईश्वरी ही तिच्या काकाच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली.
हे ही वाचा : श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबला वडिलांची साथ? पोलिसांनी सांगितली Inside story
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला उपचारासाठी जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ईश्वरी आणि तिच्या चुलत बहिणीमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून सतत भाडंण होत असत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Murder Mystery, Murder news