पोलिस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना जन्मठेप

पोलिस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना जन्मठेप

पोलिस असल्याची बतावणी करुन दोघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणातील दोन्ही दोषींना जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

जालना, 20 मार्च: दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर 7 वर्षानंतर चारही दोषींना शुक्रवारी (20 मार्च 2020) पहाटे 5 वाजून 30 मिनिटांला फाशी दिली गेली. 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री या नराधमांची निर्भयासोबत मानवतेला काळिमा फासणारं कृत्य केलं होतं. अशीच घटना जालना शहरात 6 जुलै 2015 रोजी घडली होती. पोलिस असल्याची बतावणी करुन दोघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणातील दोन्ही दोषींना जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय हावरे आणि नितीन साळवे अशी या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींची नावं आहेत.

हेही वाचा...निर्भयाच्या चारही आरोपींचा शेवटचा अर्धा तास, वाचा काय झालं तिहार जेलमध्ये...

मित्राला भेटायला गेली होती मुलगी..

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मित्राला भेटायला गेली असता संजय हावरे आणि नितीन साळवे या दोघांनी तिला पोलिस असल्याची बतावणी करून जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. ही घटना 6 जुलै 2015 रोजी घडली होती. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणाचा तपास अधिकारी तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना बलात्कारच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हेही वाचा...अंतराळातून पृथ्वीकडे येतोय मोठा धोका, आदळला तर देशच्या देश होतील नष्ट?

दरम्यान, संजय हावरे याला याच प्रकरणातील पीडितेला तिचा मोबाइल देण्याच्या बहाण्याने बोलावून परत बलात्कार केल्याप्रकरणी 10 दिवसांपूर्वी न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

First published: March 20, 2020, 9:54 PM IST

ताज्या बातम्या