Home /News /maharashtra /

अजब प्रेम की गजब कहानी: लग्नानंतर पतीनेच प्रियकरासोबत लावून दिले पत्नीचे लग्न; जालन्यातील घटना

अजब प्रेम की गजब कहानी: लग्नानंतर पतीनेच प्रियकरासोबत लावून दिले पत्नीचे लग्न; जालन्यातील घटना

Love Story: प्रेमात कोण काय करेल याचा काही नेम नसतो. मात्र, आता अशी एक घटना समोर आली आहे जेथे पत्नीच्या प्रेमापुढे पतीने माघार घेत तिचे लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

जालना: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना विविध त्रासांना सामोरे जावं लागत असल्याचं आपण पाहत असाल. लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान, छोटेखानी कार्यक्रमात पालक आपल्या पाल्यांचा लग्न उरकून देत असल्याने अनेक प्रेमी युगुलांना देखील याचा फटका बसतोय. मात्र, लॉकडाऊनमध्ये आपल्या मुलीचा बळजबरी लग्न (Marriage) लावून देणे एका पालकांना जर जास्तच महागात पडलं. लग्नाच्या महिन्याभरातच आत्महत्येचा बनाव करून नवविवाहितेने आपला प्रेमप्रकरण जाहीर करत नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला. अखेर प्रेमापुढे सर्वांनाच गुडघे टेकावे लागले आणि प्रियकरासोबत लग्न लावून देण्यास आई, वडिलांसह पती आणि सासरच्यांनी होकार (man marries wife to her lover) द्यावा लागला. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील ही अजब प्रेम की गजब कहानी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. बायकोसाठी कायपण! विवाहानंतर पत्नीचं परपुरुषावर जडलं प्रेम, पतीनं स्वतः लावून दिलं लग्न काय आहे संपूर्ण प्रकरण? जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढोणा शिवारात एका नवविवाहीतेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेण्यास सुरूवात केली मात्र, ही नवविवाहित कुठेच दिसत नव्हती. त्यानंतर अखेर विहिरीतील पाणी उपसण्यासाठी दोन पंप लावण्यात आले. पाणी उपसल्यानंतर विहिरीत कुणीच नसल्याचं लक्षात आलं. विहिरीच्या शेजारी नवविवाहितीची चप्पल होती त्यामुळे नववधू गेली कुठे असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ही नववधू विहिरीच्या शेजारी बसून रडत असल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर तिला विचारले असता तिने सर्व प्रकार सांगितला. आपले एका तरुणावर प्रेम आहे मात्र, आई-वडिलांनी लग्न लावून दिले आणि आता पतीसोबत रहायचे नसून प्रियकरासोबतच रहायचे असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी आणि पती-सासरच्यांनी तिचा विवाह प्रियकरासोबत लावून देण्याचं ठरवलं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Marriage

पुढील बातम्या