जालना, 10 मे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातल्या वादामुळे जालना लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. इथे दानवे विरुद्ध काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात लढत होती.
दानवेंचा 4 वेळा विजय
जालन्याची जागा भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची होती. रावसाहेब दानवे हे जालन्यातून चार वेळा संसदेत निवडून गेले. त्यांना सतत विजय मिळाल्यामुळे यावेळीही त्यांना इथून लोकसभेचं तिकिट देण्यात आलं.
खोतकरांचं बंड शमलं
शिवसेनेचे अर्जुन खोतकर या जागेसाठी अडून बसले होते पण नंतर त्यांचं बंड शमलं आणि ते दानवेंना समर्थन द्यायला तयार झाले. जालन्याची जागा अर्जुन खोतकर यांना हवी होती पण अखेर त्यांची समजूत काढण्यात यश आलं. ही जागा अखेर भाजपकडे म्हणजे रावसाहेब दानवेंकडेच गेली.
1996 पासून भाजपचं वर्चस्व
जालन्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, बसपा या पक्षांचे उमेदवार असले तरी मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होती. मागच्या सहा निवडणुकांमध्ये इथे भाजपचंच वर्चस्व होतं. 1996 पासून 2014 पर्यंत ही जागा भाजपकडेच होती.
मागच्या निवडणुकीत दानवेंचा विजय
मागच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी विलास औताडे यांचा दणदणीत पराभव केला होता. इथे बहुजन समाज पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता.
दुसऱ्या टप्प्यात मतदान
जालना लोकसभा मतदारसंघात पैठण, जालना, बदनापूर, भोकरदन, फुलंब्री, सिल्लोड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. जालन्यामध्ये 16 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत.जालन्यामध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं.
==========================================================================
महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी, पंढरपूरमध्ये उभारलं विठ्ठलाचं स्वतंत्र मंदिर