Home /News /maharashtra /

पैशांच्या आमिषापुढे शिक्षकही फसला, मोठी फसवणूक करणारी टोळी गजाआड

पैशांच्या आमिषापुढे शिक्षकही फसला, मोठी फसवणूक करणारी टोळी गजाआड

याप्रकरणी गुन्हा नोंदवित तालुका जालना पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातून 5 जणांना अटक केली.

जालना, 30 ऑक्टोबर : बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्यांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना जेरबंद करण्यात जालना पोलिसांना यश आलं आहे. शहरातील चौधरीनगर भागातील शिक्षक लक्ष्मण मुळे यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त पैशाचे आमिष दाखवत 2 लाख 32 हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंदवित तालुका जालना पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातून 5 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपितांच्या ताब्यातून कार,मोबाईल्स, लॅपटॉप,एटीएम कार्ड्ससह सुमारे 13 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी वडते हे करत आहेत. हेही वाचा - धुळ्यातील खळबळजनक घटना, आढळला महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह! या टोळीने अजून किती लोकांना गंडवलं आहे, याचा पोलीस तपास करत असून नागरिकांनी अशा आमिशना बळी पडू नये असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. पैशाचं, नोकरीचं आमिष दाखवून नागरिकांना लुबाडण्यात येत आहे. त्यामुळे अधिक पैसे किंवा सहज नोकरी अशा गोष्टी देण्याचा बहाणा करणाऱ्यांपासून दूर राहिल्यास होणारं नुकसान टाळणं शक्य होईल.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या