Home /News /maharashtra /

ऊनाचा पारा वाढल्यानंतर जालन्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एनर्जी ड्रिंक्सवर मारला डल्ला

ऊनाचा पारा वाढल्यानंतर जालन्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एनर्जी ड्रिंक्सवर मारला डल्ला

दुकानात चोरट्यांनी चक्क एनर्जी ड्रिंकवरच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जालना, 21 फेब्रुवारी : जालन्यात ऊनाचा पारा चांगलाच वाढला आहे. या ऊनापासून वाचण्यासाठी चोरट्यांनी आता थेट एनर्जी ड्रिंककडेच मोर्चा वळवला आहे. शहरातील मध्यवस्तीत गजबजलेल्या पाणी वेस परिसरातील एका दुकानात चोरट्यांनी चक्क एनर्जी ड्रिंकवरच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुंदर कुँवरपुरीयाँ यांचे पाणी वेस जवळ संवाद मल्टी सर्विस हे मोबाइल रिचार्ज आणि कोल्ड्रिंक्स विक्रीचे दुकान असून नेहमीप्रमाणे ते काल रात्री दुकान बंद करून घरी गेले. आज सकाळी दुकान उघडले असता गल्ल्याचे ड्रावर उघडे दिसले आणि सामान अस्ताव्यस्त स्थितीत आढळून आले. त्यानंतर दुकानात चोरी झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मध्यरात्री अद्यात चोरट्यांनी दुकानात वरील भागातून प्रवेश करून गल्ल्यातील शंभर, पन्नास आणि दहाच्या नोटा असे 6 हजार 900 रुपये रोख, 10 हजार रुपये किमतीचे सॅमसंग, मायक्रोमॅक्स, कंपनीचे चार मोबाइल, एनर्जी ड्रिंक असलेल्या रेडबूल आणि नेशन कंपनीचे चार हजार आठशे रूपये किमतीचे दोन बॉक्स असा एकूण 21 हजार 700 रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. 'गद्दारांची हकालपट्टी करणार', राज ठाकरेंनी दम दिल्यानंतर मनसेत पडली पहिली विकेट विशेष म्हणजे यापूर्वीही संवाद मल्टी सर्विस दुकान चोरट्यांनी लक्ष केंद्रित करून चार वेळेस हात साफ केला आहे. या घटनांचा तपास अद्यापही लागला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले. सतत होत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे सुंदर कुँवारपुरीयाँ हे भयभीत भयभीत झाले असून याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास महिला पोलिस नाईक कांबळे ह्या करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Jalna Crime, Jalna news

पुढील बातम्या