Home /News /maharashtra /

जालन्यातील कोरोना संशयितांमध्ये वाढ, तर एकूण 41 जणांना केलं होम क्वारंटाइन

जालन्यातील कोरोना संशयितांमध्ये वाढ, तर एकूण 41 जणांना केलं होम क्वारंटाइन

जालन्यातील कोरोनाच्या संशयितांची संख्या आता 3 वर पोहचली आहे.

जालना, 17 मार्च : जालना जिल्ह्यात आज कोरोनाचा अजून एक संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. ज्यामुळे जालन्यातील कोरोनाच्या संशयितांची संख्या आता 3 वर पोहचली आहे. आज आढळलेला संशयित हा काही दिवसांपूर्वीच चीनवरून परतला आहे. जालन्यात आज आढळलेल्या कोरोना संशयिताला सध्या कुठल्याही प्रकारचं त्रास नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 34 व्यक्तींसोबतच याव्यतिरिक्त थायलंडहून परतलेल्या 7 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या 41 एवढी झाली आहे. जालन्यातील या तिघा संशयितांपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. तर बाकीच्या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत रवाना करण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानन्तरच या दोघा संशयितांना कोरोनाची लागण झालीय की नाही हे स्पष्ट होणार आहे. हेही वाचा- महाराष्ट्रात असा शिरला Coronavirus! तेव्हाची एक चूक पडली महाग दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये याचा खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयांबरोबरच,चित्रपट गृह, शॉपिंग मॉल,आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात 3 ठिकाणी तर जिल्ह्यात तालुका आणि उपविभाग स्तरावर क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Jalna news

पुढील बातम्या