फोटो काढण्याच्या नादात आरोग्यमंत्र्यांनाच पडला सोशल डिस्टन्सिंगचा विसर, टीकेची झोड

फोटो काढण्याच्या नादात आरोग्यमंत्र्यांनाच पडला सोशल डिस्टन्सिंगचा विसर, टीकेची झोड

उद्घाटन समारंभात अनेक मान्यवरांच्या चेहऱ्यावरून मास्क गायब असल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

जालना, 11 ऑक्टोबर : कार्यक्रम सुरू असताना फोटो सेशनच्या नादात आरोग्यमंत्र्यांनाच सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटन समारंभात ही घटना घडली. उद्घाटन समारंभात अनेक मान्यवरांच्या चेहऱ्यावरून मास्क गायब असल्याचं पाहायला मिळालं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतःच फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं फोटोतून दिसत आहे. चक्क आरोग्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजाराच्या उंबरठ्यावर असून 240 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग लोकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करत आहे. मास्क न वापरणे व सोशल डिस्टनसिंगचा पालन न करणाऱ्या सामान्य जालनेकरांवर पोलीस आणि नगर पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र आरोग्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात असं होत असेल तर कोरोनाला कसं रोखणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला तहसीलदार विद्याचरण कडवकर, कल्याण सपाटे, विष्णुपंत गायकवाड, सतिशराव होंडे, भाऊसाहेब कनके, ॲड संजय काळबांडे, भैय्यासाहेब हातोटे, शरदराव टोपे, अमोल टोपे, रजियोद्यीन पटेल, बापुराव खटके, रईस बागवान, संजय पटेकर, संजय कनके, विष्णुपंत उडदंगे, सिताराम लहाने, किशोर नरवडे, कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, संचालक श्रीरंगराव पैठणे, अमरसिंह खरात,सरदारसिंग पवार, मनोज मरकड, फत्तेयाबखॉ पठाण, सुरेशराव औटे, शेषराव जगताप, विकास कव्हळे, किरण तारख, नरसिंगराव मुंढे, बाबासाहेब कोल्हे, कैलास जीगे, पाराजी सुळे, दत्तु जाधव, त्र्यंबकराव बुलबुले, अशोक आघाव, सदाशिव दुफाके, तात्यासाहेब उढाण, सुधाकराव खरात, विठ्ठल आढाव, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बी.टी पावसे, कार्यकारी संचालक दिलीप पाटील,कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Published by: Akshay Shitole
First published: October 11, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या