जालन्यातील 'त्या' रिपोर्टमुळे 3 दवाखान्यांसह 1 हजार 500 लोकांना दिलासा

जालन्यातील 'त्या' रिपोर्टमुळे 3 दवाखान्यांसह 1 हजार 500 लोकांना दिलासा

दोन्ही खासगी आणि एका सरकारी रुग्णालयातील काही स्टाफ तिच्या संपर्कात आला होता.

  • Share this:

जालना, 8 एप्रिल : जालन्यातील दुखीनगर येथील एका कोरोना पोसिटीव्ह महिलेच्या शिक्षिका मुलीसह 26 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहरातील 2 खाजगी आणि 1 सरकारी रुग्णालयातील स्टाफसह रांजनी गावातील सुमारे दीड हजार लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दोन दिवसांपूर्वी शहरातील दुखीनगर भागातील एका 65 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली होती. सदर महिलेनी सामान्य रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 2 खासगी रुग्णालयात देखील उपचार घेतले होतं. या दोन्ही खासगी आणि एका सरकारी रुग्णालयातील काही स्टाफ तिच्या संपर्कात आला होता.

दरम्यान, सदर महिलेची एक मुलगी रांजणी येथे शिक्षिका असून ती तिच्याकडे काही दिवस रांजणी येथील आपल्या मुलीच्या घरी वास्तव्यास गेली होती. सदर शिक्षिका मुलगी रांजनी येथे शालेय पोषण वितरणाच्या माध्यमातून सुमारे दीड हजार ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्याही संपर्कात आली होती. या सर्वांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्वारन्टाइन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामुळे भीतीचे वातावरण पसरून सर्वांचे लक्ष वैद्यकीय अहवालाकडे लागले होते.

हेही वाचा- 'आपण कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आहोत', अकोल्यातील जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

दरम्यान, सदर महिला रुग्णाच्या शिक्षिका मुलीसह 26 जणांचा वैद्यकीय अहवाल आज निगेटिव्ह आला असून या रिपोर्टसमुळे शहरातील 2 खाजगी आणि 1 सरकारी रुग्णालयातील स्टाफसह रांजनी गावातील सुमारे दीड हजार लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 8, 2020, 6:28 PM IST

ताज्या बातम्या