मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय, नेत्याच्या आरोपामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय, नेत्याच्या आरोपामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

राज्य सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत जालन्यातील काँग्रेस आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे.

जालना, 21 ऑगस्ट : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या आमदारानेच सरकावर गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. नगरविकास खात्याकडून काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी देण्यात भेदभाव करण्यात येत आहे. काँग्रेसचे वरीष्ठ आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घातली, अशी माहितीही आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिली. गेल्या 8 महिन्यांपासून नगरविकास खात्याने जालना नगरपालिकेला दमडीचेही पैसे दिले नाहीत. माझ्यासारख्या काँग्रेसच्या 11 आमदारांच्या ताब्यात असलेल्या पालिकांना पैसे मिळालेले नाहीत. ही बाब आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांच्या कानावर घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखील ही बाब आम्ही लक्षात आणून दिली असून त्यांनी आम्हाला निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे पालिकेला नक्कीच निधी मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 4 पालिकांचा रद्द करण्यात आलेला निधी पुन्हा मिळावा अशी मागणी देखील गोरंटयाल यांनी केली. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव आल्याने ठाकरे सरकारवर संकटाचे ढग आहेत. त्यातच सत्तेत सामील असलेल्या काँग्रेस आमदारानेही जाहीरपणे सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप केल्याने उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Congress, Uddhav thackeray

पुढील बातम्या