Home /News /maharashtra /

JCB नं पाण्यातून बाहेर काढली तिजोरी! फिल्मी स्टाईल लावला बँक रॉबरीचा छडा

JCB नं पाण्यातून बाहेर काढली तिजोरी! फिल्मी स्टाईल लावला बँक रॉबरीचा छडा

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पानेवाडी शाखेची तिजोरी पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश

जालना, 6 सप्टेंबर: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पानेवाडी शाखेची तिजोरी पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी चौघांना जेरबंद करण्यात आले असून जेसीबीच्या माध्यमातून सदर तिजोरी पाण्यातून बाहेर काढण्यात आली. हेही वाचा...इलेक्ट्रिक DPचा स्फोट, उष्ण ऑईलमुळे होरपळून 4 महिन्यांच्या नातीसह आजीचा मृत्यू जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी शाखेत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांचे अनुदान वाटप करण्यासाठी मुख्य शाखेतून 7 लाख 28 हजार रुपयांची रक्कम शाखेत आणून ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी ही रक्कम तिजोरीसह लंपास केली होती. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआरही नेला होता. यघटनेमुळे एकच खळबळ माजली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पथकासह 24 तासांत या चोरीचा तपास करून छडा लावला आहे. जालना शहरातील शिक्कलकरी मोहल्ल्यातील चार चोरांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांनी ही तिजोरी एका पाण्याच्या डबक्यात फेकून दिली होती. हेही वाचा...लघुशंकेला जातो असं सांगून कोरोनाबाधित रुग्ण गेला हॉस्पिटलच्या टेरेसवर अन्... पोलिसांनी या बँक रॉबरीचा तपास फिल्मी स्टाईल लावून चक्क जेसीबीच्या साह्याने सदर तिजोरी पाण्यातून बाहेर काढली. ही चोरी करण्यासाठी चोरट्यांनी जालन्यातून एक टाटा सुमो जीप चोरी केली होती. दरम्यान, चोरट्यांनी चोरीच्या पैशातून एक मोटार सायकल आणि नला टीव्ही खरेदी केला होती. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Marathwada

पुढील बातम्या