मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, PSI आणि इतर 3 कर्मचारी गंभीर जखमी

पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, PSI आणि इतर 3 कर्मचारी गंभीर जखमी

पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात (Jalna Accident) झाला असून पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात (Jalna Accident) झाला असून पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात (Jalna Accident) झाला असून पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

जालना, 30 मार्च : जालन्यात पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात (Jalna Accident) झाला असून पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सिंदखेडराजा रोडवर दत्त आश्रमाजवळ रात्री हा तिहेरी अपघात झाला आहे.

तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामदास काकडे हे पोलीस कर्मचारी उगले, दिगंबर चौरे आणि चालक नागरे यांच्यासह जालना शहराकडून सिंदखेडराजा रोडकडे पेट्रोलिंग करीत निघाले होते. त्यादरम्यान, सिंदखेडराजाकडून येणाऱ्या एका भरधाव स्कॉर्पिओ जीपने समोर असलेल्या एका दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर ही जीप विरोधी दिशेला असलेल्या पोलिसांच्या जीपवर जाऊन धडकली.

हेही वाचा - कारच्या धडकेत रिक्षातील CNG टाकीचा स्फोट, 4 जणं जागीच ठार; थरारक LIVE VIDEO आला समोर

या तिहेरी अपघातात पोलीस जिपसह दुचाकी व स्कॉर्पिओचंही मोठे नुकसान झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक काकडे, पोना. उगले, पोकाँ. दिगंबर चौरे व चालक नागरे हे जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक काकडे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्कॉर्पिओमधील काही प्रवाशी व दुचाकीस्वार हेही जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

पोलीस निरीक्षक काकडे यांच्या डोळ्याच्या खालील भागास मार लागल्यामुळे डोळ्याला रक्त पुरवणारी रक्तवाहिनी डॅमेज झाली आहे. न्यूरो सर्जन जालन्यात नसल्यामुळे त्यांना सिग्मा हॉस्पिटल येथे रेफर केले आहे. त्यांची आणि इतर जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.

First published:

Tags: Accident, Car, Fire, India, Jalgaon, Police, Road accident, Shocking news