डंपर आणि कारची भीषण धडक, लग्नासाठी गेलेले 10 वऱ्हाडी ठार

डंपर आणि कारची भीषण धडक, लग्नासाठी गेलेले 10 वऱ्हाडी ठार

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोली गावावर शोककळा

  • Share this:

जळगाव, 03 फेब्रुवारी: लग्नाहून परत येत असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर काळानं घाला घातला. हिंगोणा गावाजवळ क्रुझर आणि डंपरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री 11 च्या सुमारास हा अपघात झाला. यावल तालुक्यातील -फैजपूर रस्त्यावरील हिंगोणा गावाजवळ ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जळगावला हलवण्यात आलं आहे. या अपघातात चिंचोल गावातील एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाल्यानं गावात शोकाकुल वातावरण आहे.

डंपच्या धडकेनंतर क्रूझर चालक धनंजय तायडे वाहनातच अडकल होता. जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. यावल आणि सावदा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

रविवारी रात्री चोपडा येथून लग्न समारंभ आटोपून चौधरी कुटुंबीय क्रूझरनं मुक्ताईनगरकडे जायला निघाले होते. त्यावेळी काही अंतरावरून भरधाव डंपर येत होता. त्याचवेळी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेमध्ये मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 55), प्रभाकर नारायण चौधरी (वय 63) यांचा मृत्यू झाला. तर जितेंद्र चौधरी (वय 35), मीनाबाई प्रफुल चौधरी (वय 27), रिया जितेंद्र चौधरी (वय 14), अन्वी नितीन चौधरी (वय 5), सर्वेश नितीन चौधरी (वय 09) यांच्यासह अनेकजण जखमी झाले आहेत.

First published: February 3, 2020, 8:42 AM IST

ताज्या बातम्या