जळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू

जळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात किनगाव जवळ झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

  • Share this:

जळगाव, 14 नोव्हेंबर - यावल तालुक्‍यातील किनगाव जवळ दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसरी व्याक्तीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. महेश पिंजरकर (रा. भुसावळ) आणि कुरबान महारु तडवी अशी या मृतांची नावे आहेत. सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातातील इतर दोन जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

महेश पिंजरकर (वय (40) हे पाडळसा येथील स्वराज ट्रॅक्टर मध्ये सेल्समन म्हणून काम करत होत. ते आपल्या दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 बी. एल. 7365) ने किनगावला जात होते. किनगाव जवळील पेट्रोल पंपासमोर मागून येणाऱ्या दुचाकी (क्रमांक एम. एच.19 ए.एस.2676) ने त्यांना मागून जबर धडक दिली.

ही धडक इतकी जबर होती की, पिंजरकर रस्त्याच्या कडेला फेकले गेले आणि जागीच ठार झाले. तर धडक मारणाऱ्या दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नेत असताना कुरबान महारु तडवी याचा देखिल मृत्यू झाला. तर सलीम तडवी (रा. वरगव्हाण) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 VIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...

First published: November 14, 2018, 11:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading