मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तक्रारदार महिला वेडसर असल्याची तक्रार', जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची क्लीन चीट

'तक्रारदार महिला वेडसर असल्याची तक्रार', जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची क्लीन चीट

जळगाव (Jalgaon) महिला शासकीय वसतीगृहामध्ये महिलांचे शोषण झाल्याचा आरोपाचे प्रकरण आजच्या दिवशीही सभागृहात गाजले. दरम्यान याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी क्लीन चीट दिली आहे

जळगाव (Jalgaon) महिला शासकीय वसतीगृहामध्ये महिलांचे शोषण झाल्याचा आरोपाचे प्रकरण आजच्या दिवशीही सभागृहात गाजले. दरम्यान याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी क्लीन चीट दिली आहे

जळगाव (Jalgaon) महिला शासकीय वसतीगृहामध्ये महिलांचे शोषण झाल्याचा आरोपाचे प्रकरण आजच्या दिवशीही सभागृहात गाजले. दरम्यान याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी क्लीन चीट दिली आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 04 मार्च: जळगाव (Jalgaon) महिला शासकीय वसतिगृहामध्ये महिलांचे शोषण झाल्याचा आरोपाचे प्रकरण आजच्या दिवशीही सभागृहात गाजले. मुलींना नग्न नाचवल्या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये घमासान पाहण्यास मिळालं. योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बुधवारी केली होती. दरम्यान आज या प्रकरणी गृहमंत्र्यांनी क्लीन चीट दिली आहे. ज्या महिलेने तक्रार केली आहे, ती वेडसर असल्याची तक्रार याआधी समोर आल्याचं गृहमंत्री म्हणाले.

या प्रकरणी 6 अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर केले. त्यांनी महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. ज्या वसतिगृहामध्ये हा प्रकार घडला त्याठिकाणी 41 महिलांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान या तक्रारीमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं गृहमंत्री म्हणाले. त्यांनी अशी माहिती दिली की, तिच्या पतीनेही याआधी त्या महिलेविरोधात तक्रार केली होती. शिवाय त्याठिकाणी पोलीस हजर असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी फेटाळला आहे. पोलिसांनी व्हिडीओ काढला यात काही तथ्य नसल्याचे गृहमंत्री म्हणाले.

(हे वाचा-अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल, मग...)

गृहमंत्र्यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की, 'जळगाव जिल्ह्यातील कृत्यात आम्ही चौकशी समिती गठित केली आहे आणि आणि त्यांनी अहवाल सुद्धा दिला आहे. पोलिसांनी महिलांचे कपडे काढून त्यांना नृत्य करायला लावलं अशी काही घडली नाही असं या अहवालात सिद्ध झालं आहे.'

यावेळी निवेदन सादर करताना गृहमंत्री असं म्हणाले की, 'जळगावातील या वसतिगृहात सांस्कृतिक कार्यक्रम होते, ज्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनीही तिथं जाऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली. महिलांच्या वसतिगृहात एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. शिवाय रजिस्टरमध्ये कुणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंदही नाही. त्यामुळे नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काहीही तथ्य नाही.'

यावर सुधीर मुनगंटीवारांनी असा सवाल उपस्थित केला की, कोरोना काळात असे कार्यक्रम घेण्यास कुणी परवानगी दिली? तेव्हा तिथे केवळ 17 महिला होत्या असल्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं.

जळगावात वसतीगृहामध्ये मुलींना चौकशीला बोलावून घेतलं. ज्या गेल्या नाहीत त्यांना कपडे काढायला लावून त्याच्या व्हिडीओ क्लीप बनवल्या, असा मुद्दा भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी उपस्थितीत केला होता.

First published:

Tags: Anil deshmukh, Jalgaon