मुलाच्या हत्येनंतर कुटुंबातील 3 जणांनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

मुलाच्या हत्येनंतर कुटुंबातील 3 जणांनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

टोणगाव परिसरातील एका बांगडी व्यापाऱ्यानं पत्नी आणि मुलीसह गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

  • Share this:

भडगाव(जळगाव), 30 मार्च : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एक हादरवणारी घटना घडली आहे. टोणगाव परिसरातील एका बांगडी व्यापाऱ्यानं पत्नी आणि मुलीसह गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोणगाव परिसरातील रहिवासी बब्बू सय्यद हे बांगड्यांचा व्यवसाय करायचे. पत्नी, मुलगा-मुलगी असा त्यांचा परिवार होता. पण आठ दिवसांपूर्वी त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. मुलाच्या हत्येमुळे सय्यद कुटुंबीय प्रचंड नैराश्यात  होते.

आपला मुलगा हयात नसल्याचं दुःख पचवणे या कुटुंबाला अवघड झाल्याने सैय्यद यांनी पत्नी-मुलीसहीत आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. शनिवारी (30 मार्च)सकाळी शेजाऱ्यांनी सैय्यद यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, पण काहीच प्रतिसाद न मिळाला अखेर दरवाजा तोडण्यात आला. यानंतर जे काही दृश्य दिसलं, ते पाहून शेजाऱ्यांना धक्काच बसला. तिघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याबाबतची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले.पण, सैय्यद कुटुंबानं मुलाच्या विरहातून आत्महत्या केली की आयुष्य संपवण्यामागे काही वेगळंच कारण आहे? या दिशेनंही पोलीस तपास करत आहेत.

वाचा अन्य बातम्या

शिवसेनेचे साताऱ्याचे उमेदवार म्हणतात, 'एकच डॅशिंग राजे...शिवेंद्रराजे'

न्यूज18 तर्फे 'अजेंडा इंडिया' कार्यक्रमाचं आयोजन, शहिदांच्या कुटुंबीयांचा होणार सन्मान

नावाआधी चौकीदार का लावता? प्रश्नाला सुषमा स्वराजांनी चतुराईनं दिलं उत्तर

VIDEO: ..आणि नातीने नाकारली शहा आजोबांची टोपी

First published: March 30, 2019, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading