वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने जे नको होतं तेच केलं, 100 जणांचा जीव धोक्यात

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने जे नको होतं तेच केलं, 100 जणांचा जीव धोक्यात

यावल पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

जळगाव, 3 जुलै : कोरोना संशयित वृध्दाचा दोन दिवसानंतर (दफनविधीनंतर) अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने यावल तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

कोरपावली येथील पोलीस पाटील सलीम रमजान तडवी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोरपावली गांवातील 81 वर्षीय वृद्धास 27 जूनला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांचे कोरोना संशयित म्हणून नमुने घेण्यात आले होते. त्यांच्यावर औषध उपचार सुरू असताना 29 जूनला ते मृत झाले.

मृत हे कोरोना संशयित असल्याने त्यांचे मृतदेहाचे अंत्यविधी करिता योग्य त्या अटी व शर्तीसह त्यांचे मुलास प्लास्टिकमध्ये सुरक्षित बांधून कोणताही विधी न करता थेट अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देऊन मृतदेह ताब्यात देण्यात आला.

सूचनेनंतरही जे नको तेच कुटुंबियांनी केले. त्यांचा मुलगा, तीन जवळचे नातेवाईक व इतर नातेवाईकांनी मृतदेह थेट स्मशानभूमीत न नेता घरी घेऊन जाऊन मृतदेहाचे बांधलेले प्लास्टिक सोडून मृतास आंघोळ घातली. त्यावेळी सदर ठिकाणी जवळचे नातेवाईक व इतर जवळपास 100 लोक अंत्यविधीसाठी जमलेले होते.

त्यांनी लॉकडाऊन व संचार बंदीचा नियम मोडून मृत जेष्ठ वृध्दावर दफनविधी केला. त्यामुळे पोलीस पाटील सलीम तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: July 3, 2020, 11:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading