मित्रांसोबतचा तो प्रवास शेवटचाच ठरला! SWIFT कार पलटल्याने झालेल्या अपघातात गमावला जीव

मित्रांसोबतचा तो प्रवास शेवटचाच ठरला! SWIFT कार पलटल्याने झालेल्या अपघातात गमावला जीव

जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:

राजेश भागवत, जळगाव, 16 फेब्रुवारी : जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात आज सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण यात जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरधाव असलेल्या स्विफ्ट कार चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात पडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. भूपेंद्र संतोष पाटील (वय 32)असं मृत तरुणाचं नाव आहे. जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील राहणारा भूपेंद्र पाटील हे ICICI बॅकेत काम करत होते.

रविवारची सुटी असल्याने भूपेंद्र पाटील हे आपल्या इतर मित्रांसोबत कोल्हे हिल्स टेकडीवर अलाफ कुलकर्णी (रा. मुंदडानगर) याच्या कारने (एच.एच. 19, बीजे 0898) गेले होते. मित्रांसोबत गप्पा मारत, मजा मस्ती करत त्यांनी दिवसभर आनंदात वेळ घालवला. मात्र सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी चारही मित्र निघाले. यावेळी भुपेंद्र पाटील हा कार चालवत होता.

तरुणाने मुलीच्या वेशात येऊन वॉचमॅनचा कापला गळा, बारमध्ये सिगारेटचे दहा रुपये देण्यावरुन वाद

टेकडीवरून कार खाली उतरवीत असताना समोर येणारी कारला वाचविण्याच्या प्रयत्नात भूपेंद्रचा कारवरील ताबा सुटला. यामुळे कार रस्त्याच्या खाली उतरून तीन वेळा पलटी झाली. यात भूपेंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published: February 16, 2020, 11:26 PM IST
Tags: jalgaon

ताज्या बातम्या