मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, आंतरजातीय विवाहाच्या रागातून बाप आणि भावाचा गरोदर तरुणीवर हल्ला!

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, आंतरजातीय विवाहाच्या रागातून बाप आणि भावाचा गरोदर तरुणीवर हल्ला!

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बाप आणि भावाने गरोदर मुलीवर (Attack on Pregnant Girl) हल्ला केला.

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बाप आणि भावाने गरोदर मुलीवर (Attack on Pregnant Girl) हल्ला केला.

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बाप आणि भावाने गरोदर मुलीवर (Attack on Pregnant Girl) हल्ला केला.

जळगाव, 20 मार्च : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा तालुक्यातील वर्डी इथं आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बाप आणि भावाने गरोदर मुलीवर (Attack on Pregnant Girl) हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी आणि जावई गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात वर्डी येथील तरुणीने आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाला तिच्या कुटुंबीयांचा मोठा विरोध होता. हाच राग मनात ठेवून तब्बल वर्षभरानंतर सदर तरुणीच्या वडील आणि भावाने जावयाला गावाबाहेर गाठून जावयावर धारदार शस्त्राने हल्ला केला. तसंच घरी येवून मुलीवर देखील हल्ला केला.

या हल्ल्यात मुलीच्या हाताचे बोट तुटले असून ती गर्भवती असल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. दोघाही जखमींना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

हेही वाचा - मुंबईजवळील शहरात महिलेवर तब्बल 4 वेळा बलात्कार, डिलिव्हरी बॉयने केलं संतापजनक कृत्य

चोपडा तालुक्यातील वर्डी येथील दिनेश ठाकरे व जया ठाकरे या दोघांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरजातीय विवाह केला होता. या रागापोटी मुलीचे वडील संतोष देवराम पाटील आणि भाऊ सुनील पाटील या दोघांनी प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये वडिलांना अटक झाली असून भाऊ फरार आहे.

दरम्यान, 'आपण एकविसाव्या शतकाचे वाटचाल करत आहोत. तरीही अशा प्रकारे आंतरजातीय विवाह केला म्हणून तरुणी गरोदर असतानाही तिच्यावरती वडिलांनी आणि भावाने हल्ला करणं ही खूप दुर्दैवी घटना आहे. अजूनही घाणेरड्या विचारांची माणसं आपल्या समाजात आहेत. आंतरजातीय विवाह हा कोणताही गुन्हा नाही,' असं मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Jalgaon