Home /News /maharashtra /

सारी रोगाने मराठवाड्यातनंतर जळगावात घातला धुमाकूळ, अवघ्या 15 दिवसांत 17 जणांचा मृत्यू

सारी रोगाने मराठवाड्यातनंतर जळगावात घातला धुमाकूळ, अवघ्या 15 दिवसांत 17 जणांचा मृत्यू

गेल्या पंधरा दिवसांच्या काळात कोरोनासारखी लक्षणे असलेल्या मात्र कोरोना निगेटिव्ह असलेल्या सतरा जणांचा मृत्यू श्वसन विकाराने झाल्याने मोठी खळबळ उडाली.

जळगाव, 18 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने जळगाव कोरोनामुक्त असल्याचं मानलं जातं आहे. मात्र असं असलं तरी गेल्या 15 दिवसात सारीच्या आजाराने 17 ते 18 जणांचा मृत्यू जिल्हा शासकीय रुग्णालयात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात हा मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने मृत्यू संशोधन समिती नेमण्यात आली असून या समितीच्या द्वारे प्रत्येक मयत रुग्णांच्या कारणाचा आता सखोल अभ्यास केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोविड 19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या देशभर कोरोनाच्या साथ पाहता रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांची कोरोनाची चाचणी घेण्यात येत असते. यामध्ये आतापर्यंत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा बरा होऊन आपल्या घरी परतला असल्याने सध्या जिल्हयात कोणताही कोरोना रुग्ण नसल्याने प्रशासन सह जनतेनेही सुटकेचा निश्वास सोडला असल्याचे पाहायला मिळत होतं. गेल्या पंधरा दिवसांच्या काळात कोरोनासारखी लक्षणे असलेल्या मात्र कोरोना निगेटिव्ह असलेल्या सतरा जणांचा मृत्यू श्वसन विकाराने झाल्याने मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर या मृत्यूंचे कारण शोधले असता हे मृत्यू सारीच्या रोगामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असून त्यांच्या मृत्यूचं सखोल कारण शोधण्यासाठी आणि पुढील काळात त्यानुसार उपाय योजना करता याव्यात, यासाठी आता मृत्यू संशोधन समिती नेमण्यात आली आहे. हेही वाचा- कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच पुण्यासह देशभरातून आली आनंदाची बातमी या समितीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या सह फॉरेन्सिक तज्ञ, वैद्यकीय अधीक्षक,आणि त्यात्या विकाराचे तज्ञा डॉक्टर यांचा समावेश असणार आहे. साधारणपणे पंधरा दिवसात ते त्याचा अहवाल शासनाला सादर करतील अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. काय आहेत सारी या आजाराची लक्षणे? साधारणपणे कोरोनाच्या रुग्णांना सुरुवातीला जाणवत असलेलीच लक्षणे सारी या आजारात दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने सर्दी खोकला ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे दिसून येतात. कोरोनाच्या प्रमाणेच साधारणपणे वयस्कर आणि मधुमेह,दमा, हृदय विकार ,एच आई व्ही सारखे आजार असलेल्या व्यक्ती या आजराच्या बळी पडत असल्याच समोर आलं आहे. या आजारात लक्षणे दिसू लागताच तातडीने उपचार करण्यात आले तर रुग्ण लवकर बरा होत असल्याचा डॉक्टरांचा अनुभव आहे. मात्र उपचार घेण्यास उशीर केलातर सारीच्या रुग्ण तातडीने गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचून मृत्यू पावत असल्याचं समोर आलं आहे. ज्याची प्रतिकार शक्ती कमी आहे, ज्यांचं वय जास्त आहे अशा व्यक्तीने या आजारा पासून दूर राहण्यासाठी कोरोनाच्या सारखाचं इतरांच्या पेक्षा अलिप्त राहणे महत्वाचे असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी आताच दिसून येत असला तरी सारी हा मात्र जुनाच आजार असल्याचे मानले जात आहे. विविध आजारांमुळे सारीची लागण होत असते. सध्या सर्व सर्दी खोकला आणि श्वसनाचे आजार असलेले रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने या ठिकाणी मृत्यू झाल्याचा आकडा मोठा दिसत आहे. या संदर्भात रुग्णलयाकडून अशा रुग्णासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी म्हटलं आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Jalgaon

पुढील बातम्या