जळगाव हत्याकांड! आरोपींकडून गुन्हा कबूल, तपासात समोर आली डोकं सून्न करणारी माहिती

जळगाव हत्याकांड! आरोपींकडून गुन्हा कबूल, तपासात समोर आली डोकं सून्न करणारी माहिती

चार अल्पवयीन बालकांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.

  • Share this:

जळगाव, 18 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात चार अल्पवयीन बालकांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन संशयीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने चारही अल्पवयीन बालकांची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय अहवालात या मृत्युमुखी पडलेल्या चार अल्पवयीन मुलांमधील 14 वर्षीय मुलीवर आरोपींकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा...जरा पहा ना ठाकरे साहेब, शेतकरी मरणाच्या दारात... VIDEO पाहून तुम्ही व्हाल भावुक

आरोपींचे आई-वडील म्हणाले, आमच्या मुलांना फासावर लटकवा..

रावेर हत्याकांड बलात्कार करण्याच्या प्रयत्नातून घडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. दुसरीकडे, आरोपींच्या आई-वडिलांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणजे, आमच्या मुलांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी केलेले कृत्य धक्कादायक असून माणुसकीला काळिमा फासणारा आहे, असं देखील आरोपींच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळासह पीडित कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यानंतर पत्रकारांशी बोलतांना हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

देशमुख यांनी सांगीतले की, बोरखेडा येथील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी चांगल्यारितीने केला आहे. पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेला आहे. आरोपींना ताब्यात घेवून पोलिसांनी योग्यरितीने चौकशी केलेली आहे. हा संपूर्ण खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालविला जाणार आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करीत असल्याची घोषणा देखील अनिल देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा..शरद पवारांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट, शिवसेना आमदाराची सोनसाखळी लांबवली

असा आहे हत्याकांडाचा घटनाक्रम...

- गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घटना घडली.

- शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी जागेच्या मालकाने पोलिसांना घटना घडल्याची माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली.

- शनिवारी, 17 ऑक्टोबर रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनेची चौकशी योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले.

- शनिवारी, 17 ऑक्टोबरला पोलिसांनी आरोपी निष्पन्न करत आरोपींना अटक केली.

- रविवार, 18 ऑक्टोबर म्हणजे रोजी आरोपींनी घटनेची कबुली दिली.

- रविवार, 18 ऑक्टोबर म्हणजे रोजी हत्याकांडातील 14 वर्षाच्या मुलींवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने हे हत्याकांड झाल्याची सूत्रांची माहिती

- रविवार, 18 ऑक्टोबर वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत मृत्यूमुखी पडलेल्या चार जणांमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट झालं.

Published by: Sandip Parolekar
First published: October 18, 2020, 5:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading