मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon: दोन मुलांसह पतीची धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या, पोलीस तपासात पत्नीचं बिंग फुटलं अन् धक्कादायक माहिती आली समोर

Jalgaon: दोन मुलांसह पतीची धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या, पोलीस तपासात पत्नीचं बिंग फुटलं अन् धक्कादायक माहिती आली समोर

जळगावात दोन मुलांसह वडिलांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 3 एप्रिल : चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका व्यक्तीने आपल्या दोन मुलांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. 13 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आपला तपास सुरू केला आणि अखेर या आत्महत्येमागचं सत्य समोर आलं आहे. पोलीस तपासात जे काही समोर आलं त्याने एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबीक वादातून आपल्या दोन लहान मुलांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 13 फेब्रुवारीला घडली होती. या घटनेने जिल्हा हादरला होता. पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे पतीने मुलांसह जीवन संपविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह दोन जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र दिलीप जाधव यांनी चिराग आणि खुशी यांना घेऊन जीवन संपवलं होतं. वाचा : ..अखेर Imran Khan यांची विकेट पडली, असंख्य नाट्यमय घडामोडींनंतर सत्तेतून 'Out'! चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हे पत्नी पूजा आणि दोन मुलांसह राहत होते. चाळीसगाव येथील जे. जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणून ते काम करत होते. जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पूजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबीक वाद सुरू होता. 13 फेब्रुवारीला सकाळी जितेंद्र यांनी चिराग आणि खुशी दोन्ही मुलांसोबत नगरदेवळा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली होती. मृत जितेंद्र जाधवचे वडील यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. पूजा जितेंद्र जाधव, ईश्वर जिभाऊ जगताप आणि एक अनोळखी इसम यांनी जितेंद्रला मारहाण केली. अपमान करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार पूजा हिच्यासह दोघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Jalgaon

    पुढील बातम्या