Home /News /maharashtra /

अखेर नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवणारा पोलीस निरीक्षक वारकरी संप्रदायासमोर नमला, मागितली जाहीर माफी

अखेर नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवणारा पोलीस निरीक्षक वारकरी संप्रदायासमोर नमला, मागितली जाहीर माफी

आपल्यावर सगळीकडून टीकेची झोड होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस निरीक्षकाने आता वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 29 एप्रिल : राज्यात ज्या पद्धतीने भोंग्याचे राजकारण (politics over loudspeaker) तापले आहे, त्याच पद्धतीने जळगावच्या चाळीसगावातही (chalisgaon) कीर्तन सुरु असताना नारदाच्या गादीवर पोलीस अधिकाऱ्याने बुटाने पाय देऊन वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय संतप्त झाले असून पोलीस अधिकारी के. के. पाटील (K K Patil) यांना जोपर्यंत निलंबित केले जाणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासाठी वारकरी संप्रदाय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन आंदोलन करून जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याचा निषेध करणार आहे. या दरम्यान आपल्यावर सगळीकडून टीकेची झोड होत असल्याचं लक्षात आल्यानंतर बंधित पोलीस अधिकाऱ्याने आता वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली. वारकरी संप्रदायात मानल्या जाणाऱ्या नारदाच्या पवित्र गादीवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी स्टेवर येवून बुटासहीत पाय ठेवल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत वारकरी संप्रदायात संताप व्यक्त करण्यात आला. घटनेबाबत जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया येत असतांना पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली आहे. नेमकं प्रकरण काय? चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत नगर परिसरात असलेल्या संतोषी माता मंदीराजवळ कीर्तन सप्ताहाचा कार्यक्रम रात्री 10 नंतर सुरू होता. ही बाब चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना समजल्याने ते कीर्तनाच्या ठिकाणी आले. दरम्यान, पोलीस निरीक्षक पाटील हे बुटासहित स्टेजवर आले. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या जाणाऱ्या नारदाच्या गादीवर बुटासहीत पाय ठेवला. या घटनेवर राज्यभरातील वारकारी संप्रदाय व हिंदू जनमानसात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. यातच पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागीतली तरी देखील या अधिकाऱ्याला निलंबित केले नाही तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (शिवसेना vs शीख संघटना भिडले, दगडफेक आणि गोळीबारानंतर SHO वर तलवारीनं हल्ला) पोलीस अधिकाऱ्याचं नेमकं स्पष्टीकरण काय? "काल रात्री लागत रोड परिसरात दहा-सव्वा दहा वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना हनुमानसिंग राजपूतनगर या भागातून लाऊडस्पिकरचा मोठमोठ्याने आवाज येत होता. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. तिथे सप्तश्रृंगी मातेच्या समोर कीर्तन सुरु होते. रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत लाऊड स्पिकरचा वापर करु नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्या आदेशाची नागरिकांना माहिती देण्यासाठी आम्ही वाहनातून उतरुन त्या कीर्तनातील माईकपर्यंत गेलो होतो. तेव्हा आम्ही शासकीय वर्दी घातली होती. आमच्या पायात बुट होते. आम्ही त्या ठिकाणी जाऊन महाराजांना विनंती केली की, दहा वाजले आहेत. लाऊड स्पिकर बंद करा, अशी विनंती केली होती. त्या ठिकाणी गेलो तिथे माईक खाली एक गादी होती. तिला नारदाची गाधी म्हणतात. तिथे अनावधानाने आम्ही बुटासहीत त्या त्या गादीपर्यंत गेलो. आम्हाला त्या गादीबाबत कोणतीही कल्पना नव्हती. त्या गादीला महत्त्व आहे याबाबात कोणतीही कल्पना नव्हती. अनावधानाने कर्तव्य बजावत असताना अनावधानाने आमचे त्या गादीवर बुटासहित पाय पडले असतील. त्याबद्दल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो", अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षकांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या