Home /News /maharashtra /

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पळाली, संतापलेल्या तरुणाने संपवलं जीवन

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पळाली, संतापलेल्या तरुणाने संपवलं जीवन

बायको आणि पैसे गेल्याने कैलास याने ‘पत्नी पळाली,1 लाख रुपये पण गेले’ असे म्हणत संतापात शनी पेठेत शनी मंदिराकडे विष प्राशन केले.

जळगाव, 8 सप्टेंबर : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पळाली आणि लग्न जुळवण्यासाठी महिला दलालांनी घेतलेले एक लाख रुपयेही बुडाल्याने कैलास संतोष चवरे (रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणात दलाल लीलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी (रा.शनी पेठ) आणि संगीताबाई रोहीदास भालेराव (37, हॅपी होम कॉलनी) या दोघींना शनी पेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. 7 ऑगस्ट रोजी कैलास याचा मृत्यू झाला होता. मयत कैलास या तरुणाचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. चार वर्षापूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. समाजात मुलींची कमतरता असल्याने मुली मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे मेहुणा संतोष रघुनाथ पाटील हे कुसुंबा येथे राहणाऱ्या कल्पनाबाई यांच्यामार्फत शनी पेठेतील लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी यांच्याकडे गेले. या दलाल महिलेने दुसरी मुलगी दाखविली. एक लाख रुपये घेऊन 30 जुलै 2020 रोजी विवाह झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी नववधू कैलासचा मोबाईल घेऊन घरातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. बायको आणि पैसे गेल्याने कैलास याने ‘पत्नी पळाली,1 लाख रुपये पण गेले’ असे म्हणत संतापात शनी पेठेत शनी मंदिराकडे विष प्राशन केले. दरम्यान, या घटनेनंतर संताष रघुनाथ पाटील यांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून नववधू, दलाल लीलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी (रा. शनी पेठ) व संगीताबाई रोहीदास भालेराव यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Jalgaon

पुढील बातम्या