मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /फक्त सेंटर उरलं, चोरांनी चक्क ATM मशीनच पळवलं, 17 लाखांची रोकड गायब

फक्त सेंटर उरलं, चोरांनी चक्क ATM मशीनच पळवलं, 17 लाखांची रोकड गायब

 या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ही घटना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ही घटना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ही घटना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.

जळगाव, 24 जून: लाखों रुपयांच्या रक्कमेसह स्टेट बँकेचे (State Bank ATM) एटीएम मशीन चोरट्यांनी (ATM machine robbery) घेऊन पोबारा केल्याने चाळीसगाव (Chalisgaon) शहरात खळबळ उडाली आहे. भडगाव रस्त्या लगत असलेल्या खरजयी रस्त्यावर असलेले एटीएम चोरट्यांनी नेलं. त्यात जवळपास 17 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगण्यात येत आहे.

चाळीसगाव शहरातील खरजई नाक्याजवळील स्टेट बॅक ऑफ इंडियाचे एटीएम मशीनच रात्री 1.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. या मशीनमध्ये 17 लाख रुपये रोकड असल्याची माहिती मिळाली आहे. अख्ख एटीएम मशीनच चोरट्यांनी कापून नेलं.  या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ही घटना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पोलीस अंमलदार विनोद खैरनार रात्री 3 वाजेच्या दरम्यान गस्त घालत असताना या घटनेचा उलगडा झाला आहे.

WTC Final : ‘तो’ एक क्षण नडला, ऋषभ पंतचं धाडस टीम इंडियाच्या अंगलट

विशेष म्हणजे, ज्या भागात हे एटीएम मशीन आहे तो पूर्णपणे रहिवासी भाग आहे. या एटीएम सेंटरला लागूनच अनेक दुकानं आणि घरं आहे. रात्री 1.30 वाजेच्या सुमारास चोरांनी एटीम मशीन कापले आणि वाहनातून पोबारा झाले.

घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांनी चारचाकी वाहनातून एटीएम मशीन चोरुन नेल्याने पोलीस चारचाकी वाहनाबाबत काही सुगावा लागतो का, यादृष्टीने तपास करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय आधिकारी कैलास गावडे , पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, एपीआय सैय्यद, एपीआय विशाल टकले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शहरातील चोरीचे सत्र हे दिवसेंदिवस वाढत असल्याने सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या चोरांचा सुगावा लावून यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी आता होत आहे.

First published: