भाजप नेत्याला मालेगाव काढा वाटणे भोवला, अन्न-औषध विभागाने दिला दणका

भाजप नेत्याला मालेगाव काढा वाटणे भोवला, अन्न-औषध विभागाने दिला दणका

गटनेते मुन्ना तेली आणि काही सहकाऱ्यांनी मालेगावातील मन्सुरा युनानी महाविद्यालयातून काढा बनवण्याचे काम सुरू केले होते.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

भुसावळ, 06 सप्टेंबर :  कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मालेगावच्या मन्सुरा युनानी काढ्याची क्रेझ वाढली होती. शहरात भाजपचे पालिकेतील गटनेते मुन्ना तेली यांनी ‘ना नफा-ना तोटा’ या तत्वावर हा काढ्याची निर्मिती व विक्री सुरू केली होती.

मात्र, त्यासाठी कोणतीही परवानगी न घेतल्याच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने काढ्याची निर्मिती सुरू असलेल्या एमआय तेली स्कूलमध्ये कारवाई करुन एक लाखाचा युनानी काढा, कांडप व पॅकेजिंग मशिनरी सील केली आहे.

बीडमध्ये खळबळ, जामिनावर आलेल्या डॉ. सुदाम मुंडेचा आणखी एक प्रताप समोर

गटनेते मुन्ना तेली आणि काही सहकाऱ्यांनी मालेगावातील मन्सुरा युनानी महाविद्यालयातून काढा बनवण्याचे प्रमाण मिळवून भुसावळमध्ये त्यातील साहित्याचे कांडप व पॅकेजिंग सुरू केले होते. मात्र, हा काढा विक्रीसाठी लागणारी परवानगी त्यांच्याकडे नसल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या.

यानंतर अन्न व औषध सुरक्षा विभागाने शहरातील अयान कॉलनीतील एमआय तेली स्कूलमधील मालेगाव काढा तयार करण्याच्या छोट्या उद्योगावर छापा टाकला.

आई समान सासूला जावयाने कायमचं संपवलं, डोक्यात लाकडी ओंडका घालून घेतला जीव

अन्न व सुरक्षा विभागाचे साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त एस.एन.साळे व औषध निरीक्षक ए.एम.माणिकराव यांच्या पथकाने कारवाई केली. त्यात एक लाखाच्या काढ्यासह काढा बनवण्यासाठी वापरण्यात येणारी मशिनरी, पॅकेजिंगचे साहित्य जप्त केले.

संपूर्ण तपास केल्यानंतर याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Published by: sachin Salve
First published: September 6, 2020, 9:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या