कामागारांचा उद्रेक, महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करून घातला गोंधळ

कामागारांचा उद्रेक, महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करून घातला गोंधळ

लॉकडाऊनचा फटका या परप्रांतीय कामगारानांही बसला असून महिनाभरापासून हे कामगार रिकामे बसले आहेत.

  • Share this:

भुसावळ, 4 मे : भुसावळ तालुक्यातील वरणगाव नाजिक फुलगांव येथे महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे . या कामावर मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश व झाडखंड येथील किमान 350 कामगार आहेत . मात्र देशभरात कोरोना या संसर्ग आजारांमुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. याचा फटका या परप्रांतीय कामगारानांही बसला असून महिनाभरापासून हे कामगार रिकामे बसले आहेत.

रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली असून त्यांना गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. मात्र, कंपनीचे अधिकारी त्यांना याबाबत सहकार्य करीत नसल्याने सोमवारी कामगारांच्या भावनांचा उद्रेक झाला. यावेळी संतप्त झालेल्या कामगारांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करून गोंधळ निर्माण केला. याची वरणगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून कामगारांची समजूत घातली आणि रितसर पासेस काढूनच आपण आपल्या गावाकडे जावू शकतात असे सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक : पुण्यातील सिंहगड परिसरात महिलेचा खून

संबंधित कंपनीकडे संपर्क साधला असता या कार्यातील सुजान सिंह म्हणाले की, आम्ही हे काम चार-पाच कंत्राटदाराला दिले आहे. संबंधित मजुरांना ठेकेदार पेमेंट देत नसतील, तर त्याची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. परंतु सर्व मजूर घरी जाण्याची ओढ लागल्याने आम्हाला घरी सोडा असे म्हणत आहेत परंतु ते आमच्या अखत्यारीत येत नसल्यामुळे अडचणी आहेत. वरिष्ठांशी बोलून हा प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतून धावली ट्रेन

देश लॉकडाऊन झाल्यापासून परराज्यातील अनेक मजूर आणि प्रवाशी ठिकठिकाणी अडकून पडले होते. याच परप्रांतीयांसाठी पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. या पैकी जवळपास 1203 लोकांची आरोग्य तपासणी होऊन आज त्यांना डहाणू रेल्वे स्थानकातून एका विशेष ट्रेनने रवाना करण्यात आले आहे. ही ट्रेन राजस्थानातील जयपूरपर्यंत धावणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 4, 2020, 6:06 PM IST

ताज्या बातम्या