मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोर्टाचाही भाजपला दणका, जळगाव पालिकेवर सेनेचा भगवा फडकणार?

कोर्टाचाही भाजपला दणका, जळगाव पालिकेवर सेनेचा भगवा फडकणार?

जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहे.

जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहे.

जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहे.

औरंगाबाद, 17 मार्च : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव महापालिकेमध्ये  (Jalgaon municipal corporation)  शिवसेनेनं (Shivsena) जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत 30 नगरसेवक आपल्या तंबूत ओढून आणले आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक टाळण्यासाठी (Jalgaon Municipal Corporation Mayor Election) भाजपने (BJP) औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad high court) धाव घेतली होती. पण, कोर्टाने भाजपची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक ही ऑनलाईन होणार आहे.

जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.  शिवसेनेच्या तंबूत गेलेल्या फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्यानं भाजपाने कोर्टात याचिका दाखल केली आणि महासभा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन घेतली तर व्हीप  बजावता येईल, अशी भूमिका मांडली.

जबरदस्त! मुंबईने फक्त 4 बॉलमध्ये जिंकली वन-डे मॅच

परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका  फेटाळून लावली आहे. कोरोना परिस्थिमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल

तर दुसरीकडे जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे.

आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या महापौरपदाचे उमेदवार जयश्रीताई महाजन व उपमहापौर पदाचे उमेदवार भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील यांनी आज मोठ्या थाटामाटात आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर नितीन लड्डा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते. ही नामांकन प्रक्रिया सुरू झालेली असून आता उद्याच्या ऑनलाइन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जवळपास या दोघी उमेदवारांची विजय निश्चित असल्याचे जोरदार चर्चा सर्वत्र आहे.

कंगना जयललितांच्या भूमिकेत, मस्करी करताय का?’; राम गोपाल वर्मांचा टोला

भाजपने अद्यापही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुट मुळे निवडणूक चुरशीची झाली आहे.

शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर सर्व भाजपने देखील नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसंच पक्षाच्या उमेदवारा व्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देखील भाजपने दिला आहे.

भाजपकडून प्रतिभा कापसे व दीपमाला काळे यांचे नाव महापौरपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तर उपमहापौरपदासाठी अद्यापही कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

First published:

Tags: BJP, Jalgaon, Shivsena