मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जळगावात अखेर 'सांगली पॅटर्न', सेनेच्या सर्जिकल स्ट्राईकने भाजपने गमावली सत्ता?

जळगावात अखेर 'सांगली पॅटर्न', सेनेच्या सर्जिकल स्ट्राईकने भाजपने गमावली सत्ता?

जळगाव महापालिका (Jalgaon municipal corporation)  महापौर निवडणुकीत भाजपला (BJP) जबर धक्का बसला असून 27 नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहे.

जळगाव महापालिका (Jalgaon municipal corporation) महापौर निवडणुकीत भाजपला (BJP) जबर धक्का बसला असून 27 नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहे.

जळगाव महापालिका (Jalgaon municipal corporation) महापौर निवडणुकीत भाजपला (BJP) जबर धक्का बसला असून 27 नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहे.

जळगाव, 16 मार्च : भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या जळगावमध्ये जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत शिवसेनेनं (Shivsena) अखेर सांगली पॅटर्न (Sangali Pattern) यशस्वी करून दाखवले आहे. जळगाव महापालिका (Jalgaon municipal corporation)  महापौर निवडणुकीत भाजपला (BJP) जबर धक्का बसला असून 27 नगरसेवक (BJP Corporator) ठाण्यात दाखल झाले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Khadse) आणि जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची घेणार भेट घेणार असून शिवसेनेला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

जळगाव महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेनं 27 नगरसेवक फोडून सुरूंग लावला आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी आणि राज्य भाजपचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीष महाजन यांच्यावर आहे. पण आता महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे बहुमत संख्याबळ शिवसेनेनं राजकीय सर्जीकल स्ट्राईक करत उद्धवस्त केले आहे.

पुण्यातील 70 वर्ष जुन्या मार्केटमध्ये भीषण आग, 25 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

जळगाव महापालिकेचे शिवसेनेनं फोडलेले सर्व 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच गिरीष महाजनांचा राजकीय पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच दे धक्का देण्याची रणनीती शिवसेनेनं आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विशेष म्हणजे, 57 सदस्य असलेल्या भाजपकडे महापौरपद आहे. मात्र, नव्या महापौरांची निवड होणार आहेत. यावेळी भाजपचे काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी सोमवारी मुंबई गाठली आहे. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. हे नगरसेवक सेनेच्या गटात गेले तर शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल.

ठाकरे सरकारच्या आदेशाने सोलापूर पालिकेत खळबळ, संपूर्ण स्थायी समितीच निलंबित

 गेल्या 5 वर्षात जळगाव जिल्ह्यात तोडफोडीच्या राजकारणात गिरीश महाजन यांनीही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता आणली. मात्र या सत्तेला आता सुरुंग लागला आहे.  तर दुसरीकडे, भाजपला धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि सुरेश जैन एकत्र येत असल्याचे हे संकेत आहेत. या दोन शक्ती एकत्र झाल्यास आगामी जिल्हापरिषद, महापालिका आणि भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी हे मोठं आव्हान ठरण्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.

कुत्र्यांच्या पिल्लांसाठी 'चिल्लर पार्टी'चा रास्ता रोको, हृदयस्पर्शी घटना

मागील निवडणुकीमध्ये भाजपने महापालिका सत्ता आणली खरी, पण राज्यात भाजपने सत्ता गमावली. गेल्या वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नाही. अशा परिस्थितीत अनेक नगरसेवक बेचैन झाले. भाजपात राहून निधी मिळू शकत नसल्याने अनेक नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागले. अखेर आता भाजपच्या ताब्यातून महापालिका सुद्धा जाताना दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Jalgaon, Shivsena